Khamgaon Mangesh Ingle : दोन पक्ष, दोन पदे… मंगेश इंगळे संचालकपदाचा मोह कधी सोडणार?

bjp-corporator-market-committee-director-post-controversy : काँग्रेसच्या काळात मिळालेल्या पदावर अद्यापही वर्णी; भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवकपद मिळवले

Khamgao शहरातील राजकीय सत्तासंघर्षात आणि पक्षांतराच्या मोसमात सध्या मंगेश इंगळे यांच्या दुहेरी पदभारामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये स्थलांतर करून नगरसेवकपद भूषवणाऱ्या इंगळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद अद्याप सोडले नसल्याने, त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. “पक्षांतर झाले, तरी पद का नाही?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मंगेश इंगळे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून नगरसेवक म्हणून आपली ओळख निर्माण केली. मात्र, काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना मिळालेले बाजार समितीचे संचालकपद त्यांनी अद्यापही कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Mahayuti Government : ना सरपंच, ना पोलीस पाटील! खामगाव तालुक्यात २६ गावांचा कारभार ‘वाऱ्यावर’

सध्या इंगळे हे भाजपचे अधिकृत लोकप्रतिनिधी असताना, काँग्रेसच्या कार्यकाळात मिळालेल्या पदावर कार्यरत राहणे तांत्रिकदृष्ट्या वैध असले तरी नैतिकदृष्ट्या त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असलेले नगरसेवकपद मिळाल्यामुळेच त्यांनी पक्षांतर केल्याचे बोलले जाते.

बाजार समितीच्या संचालकपदाबाबत इंगळे यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. नगरसेवक झाल्यानंतर ते या पदाचा त्याग करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र अद्याप तरी तसे घडलेले नाही. पद कायम ठेवल्यामुळे जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, तर नव्या पक्षातही या दुहेरी लाभामुळे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. संचालकपदाचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत ते पदावर राहणार की आगामी जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी राजीनामा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.