Narhari Zirwal : झिरवळ म्हणतात, ‘लाच प्रकरणात दोषी आढळलो तर तत्काळ राजीनामा देईन’

narhari-zirwal-bribe-case-clerk-arrest-ministry-resignation-challenge : मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एसीबी’चा छापा; ३५ हजारांच्या लाचेसह क्लार्क राजेंद्र ढेरंगे गजाआड

Mumbai मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयाशी संबंधित क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना झिरवळ यांनी, “चौकशीत दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन आणि पदाचा राजीनामा देईन,” अशी घोषणा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या क्लार्कचे नाव असून, तो अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत आहे. ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी झालेल्या या कारवाईने प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

https://sattavedh.com/pm-narendra-modi-pm-modi-to-inaugurate-50-electric-buses-nagpur-valentine-day

या प्रकरणात स्वतःचे नाव गोवले जात असल्याचे पाहून नरहरी झिरवळ यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. “मंत्रालयात घडलेल्या या प्रकाराशी माझा कोणताही थेट संबंध नाही. क्लार्कने वैयक्तिक स्तरावर हा गुन्हा केला असावा,” असे त्यांनी स्पष्ट केले. झिरवळ यांनी सांगितले की, त्यांनी नेहमीच स्वच्छ प्रतिमा जपली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार आहेत.

Nagpur Municipal corporation : भाजपने ठरवला स्वीकृत सदस्यांचा फॉर्म्युला; कोणाची लागणार लॉटरी?

“जर तपासात माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला किंवा मी दोषी आढळलो, तर एका क्षणाचाही विचार न करता मी राजीनामा देईन,” असे ठाम विधान त्यांनी केले आहे. दुसरीकडे, या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “मंत्रालयातच जर भ्रष्टाचाराचे पेव फुटले असेल, तर ग्रामीण भागात काय स्थिती असेल?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत झिरवळ यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी काही प्रमुख नेत्यांनी केली आहे.