व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Pankaj bhoyar : पाकिस्तानी दहशतवाद्याचा मोठा कट उधळला; १५७ ठिकाणी छापे, १००...

Pankaj bhoyar : पाकिस्तानी दहशतवाद्याचा मोठा कट उधळला; १५७ ठिकाणी छापे, १०० संशयित ताब्यात

Major terror plot linked to a Pakistani terrorist foiled; raids conducted at 157 locations, with 100 suspects detained : गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा खळबळजनक खुलासा

Nagpur पाकिस्तानात बसून महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा एक मोठा आणि धोकादायक कट राज्य दहशतवादविरोधी पथकाने वेळीच उधळून लावला आहे. शहजाद भट्टी हा पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानातूनच काही मोठे कट रचत असल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या सॉलिड माहितीच्या आधारे ‘एटीएस’ने अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने हालचाली करत हा संपूर्ण कट हाणून पाडला आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपुरात दिली.

या आंतरराष्ट्रीय कटाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ‘एटीएस’ने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी मोठी मोहीम राबवली असून शहजाद भट्टीशी संबंधित असलेल्या राज्यातील तब्बल १५७ संशयास्पद ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकून धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत आतापर्यंत जवळपास १०० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून काही अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली असून या माहितीच्या आधारे राज्यात अजूनही काही ठिकाणी मोठ्या कारवाया अपेक्षित आहेत.

Chandrashekhar bawankule : फक्त निलंबन नाही, आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार

दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना पंकज भोयर म्हणाले की, महाराष्ट्रात हिंसाचार आणि घातपात घडवण्यासाठी शस्त्रे उपलब्ध करून देणे, हा या कटाचा मुख्य उद्देश होता. यासाठी थेट पाकिस्तानातून ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवले जात होते आणि त्या पैशांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विघातक कारवाया घडवून आणण्याचा या पाकिस्तानी दहशतवाद्याचा क्रूर प्रयत्न होता.

मात्र, महाराष्ट्र एटीएसने अत्यंत सतर्कता दाखवून योग्य वेळी हस्तक्षेप केला आणि त्यांचे हे मनसुबे धुळीस मिळवले. या प्रकरणात ज्यांनी कोणी देशविरोधी कृत्य किंवा गंभीर गुन्हा केला असेल, त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी एटीएस २४ तास कार्यरत असते आणि जेव्हा अशी ठोस माहिती मिळते तेव्हा ती मोठी कारवाई करत असते, असे सांगत गृह विभाग राज्याच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis : ‘मी परवाच दिल्लीत जाऊन आलो…’; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

यासोबतच, राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांनाही गृहराज्यमंत्र्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. बोगस बियाण्यांच्या प्रकरणात केवळ कृषी विभागच नव्हे, तर गृह विभाग देखील तितक्याच आक्रमकतेने काम करत असून या फसवणुकीत जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर गृह विभागाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

कृषिमंत्र्यांनी या संदर्भात आधीच एक महत्त्वाची बैठक बोलावली असून, बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर जरब बसवण्यासाठी अत्यंत कठोर कायदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!