Breaking

Sarpanch Murder Case : सर्वपक्षीय मोर्च्यातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

Demand for Dhananjay Munde’s resignation from an all-party agitation : जनआक्रोशच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन

Akola जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना सादर केले. या निवेदनात संतोष देशमुख Santosh Deshmukh हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय मोर्च्यामधून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच दिसत आहे. मुंडे यांनी आपले राजकीय जीवन संपविण्यासाठी कट रचला जात असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी केला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेल्या जनआक्रोश मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील, आमदार नितीन देशमुख, बौद्ध समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे नवे शिलेदार मैदानात

जातीचा नव्हे, न्यायाचा लढा – धनंजय देशमुख
‘हा लढा कोणत्याही एका जातीचा नसून, हा न्यायाचा लढा आहे,’ असे स्पष्ट धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व समाज घटकांना खांद्याला खांदा लावून या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनीही ‘न्याय मिळाला पाहिजे, यासाठी लढ्यात सर्वांनी सोबत द्यावी,’ असे भावनिक आवाहन केले.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या – आमदार नितीन देशमुख
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र आहे. पण तरीही मुंडे यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही, असा थेट सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ‘धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील यांनीही “हा प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हायचा असेल, तर धनंजय मुंडे यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

टोकाचा निर्धार
या मोर्चाच्या माध्यमातून संतोष देशमुख प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी, आणि मंत्रिमंडळातील गुन्हेगारी छायाचित्रे असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनातून एकत्रित लढ्याची ताकद दाखवण्याचा निर्धार दिसून आला.