Nagpur municipal corporation : महापालिका निवडणुकीत पतीने केली बंडखोरी, माजी महापौर झाल्या भाजपच्या प्रदेश सचिव

Archana-dehankar-gets-place-in-BJP-state-Executive-body : अर्चना डेहनकर यांना पक्षाने दिली संधी, निवडणुकीतील सर्व गुन्हे माफ

Nagpur महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती यांनी केलेली बंडखोरी चांगलीच गाजली होती. केंद्रीयमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरासमोरच जाहीर सभा घेऊन चांगलीच टोलेबाजी केली होती. या निवडणुकीत विनायक डेहनकर निवडून आले नाहीत मात्र भाजपचा उमेदवार पराभूत झाला. हे बघता अर्चना डेहनकर यांची भाजपातून गच्छंती होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत त्यांची सचिव म्हणून नियुक्ती करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हे बघता निवडणुकी दरम्यान केलेले सारे गुन्हे माफ असेच धोरण भाजपने स्वीकारले असल्याचे स्पष्ट होते.

विनायक डेहनकर हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पत्नी अर्चना डेहनकर महापौर होत्या. यावेळच्या निवडणुकीत विनायक डेहनकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. ते माघार घेतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र ते शेवटपर्यंत मागे हटले नाही.

Bhaskar jadhav “सरकार इतकं लबाड की राज्यपालांकडूनही खोटं बोलवलं”

 

पत्नी भाजपात आणि पती बंडखोर उमेदवार अशी परिस्थिती डेहनकर यांच्या घरी निर्माण झाली होती. त्यांच्याबाबत भाजपात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद टाळण्यासाठी अर्चना डेहनकर या माहेरी निघून गेल्या होत्या. या दरम्यान भाजपच्या उमेदवाराने गणेशपेठ परिसरात डेहनकर यांच्या घरासमोरच नितीन गडकरी यांची प्रचार सभा लावली.

आपल्या भाषणात गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कधीच समाधानी होत नाही असे सांगताना एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले, एक महिला माझ्याकडे महापालिकेचे तिकीट मागायला आली होती. निवडून आल्यानंतर महापौर करा अशी विनंती तिने केली. नंतर तिला आमदार व्हायचे होते. ते शक्य झाले नाही तर पुन्हा महापालिकेचे तिकीट मागायला आली.

samruddhi-land scam : समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा जमीन घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी

एकाच कार्यकर्त्यांना किती वेळा संधी द्यायची अशी विचारणा करून गडकरी यांनी डेहनकर यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली होती. महापालिकेच्या निवडणुकीतील बंडखोरी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फारसा फटका भाजपला बसला नाही. सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले.

पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. त्यानंतर बंडखोर व उघडपणे पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्यांची गंभीर दखल भाजपात घेतली जाईल असे बोलले जात होते. मात्र अर्चना डेहनकर यांना प्रदेश कार्यकारिणीत दिलेले स्थान बघता पक्षाच्या पातळीवर भाजपने बंडखोरीचा विषय बंद केला असल्याचे दिसून येते.