Ajit Pawar plane accident : पोलीस ठाण्यात तणाव; रोहित पवार, अमोल मिटकरी यांची पोलिसांशी बाचाबाची !

rohit-pawar-amol-mitkari-aggressive-marine-drive-police-station-vsr-dgca-fir-demand : व्हीएसआर कंपनी व डीजीसीए विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनप्रकरणी कारवाईच्या मागणीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित विमान कंपनी व नागरी उड्डाण महासंचालनालयाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाबाबत पुरावे समोर आले असूनही कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत हे दोन्ही नेते आक्रमक झाल्याचे दिसून आले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तातडीने एफआयआर नोंदवावा, अशी ठाम भूमिका मांडली. केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष गुन्हा दाखल करून जबाबदारी निश्चित करावी, अशी त्यांची मागणी होती.

Devendra fadnavis : आर्थिक शिस्तीचा पहिला निर्णय; देवेंद्र फडणवीस यांची पुरवणी मागण्यांवर कात्री

डीजीसीएच्या अहवालात व्हीएसआर कंपनीकडून त्रुटी झाल्याचे नमूद असल्याचा दावा करत संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. विमानाच्या देखभालीत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. अपघाताच्या वेळी तो केवळ दुर्घटना असल्याचे सांगितले गेले होते; मात्र नंतरच्या तपासात देखभालीतील त्रुटी स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलीस ठाण्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर काढण्यात आले, तर केबिनमध्ये रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून कायदेशीर चौकटीत योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत असताना नेत्यांनी तातडीची कारवाई करण्यावर भर दिला.

Baramati bypoll election : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उमेदवार

या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विमान अपघातप्रकरणी पुढे कोणती कायदेशीर पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.