व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट

ZP election : झेडपीची निवडणूक केव्हा? पावसाळ्यापर्यंत बघावी लागणार वाट

zilla-parishads-from-vidarbha-to-wait-till-monsoon-for-elections : विदर्भाच्या वाट्याला प्रतिक्षाच; न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून

Nagpur नागपूरसह विदर्भातील जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला आहे? यास आता आता वर्ष उलटले आहे. एकूणच आरक्षण ५० टक्क्यांच्यावर गेल्याने विदर्भातील सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील तारीख जुलै महिन्याची दिली आहे. हे बघता आता पावसाळा आटोपल्यावर निवडणुका होणार स्पष्ट झाले झाले आहे.

महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. असे असतानाही आरक्षणाच्या सोडतीत याकडे दुर्लक्ष करून निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. या विरोधात न्यायालयात याचिका दखल करण्यात आल्याने विदर्भात एकाही ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकली नाही. उर्वरित महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकालाही जाहीर झाला आहे. मात्र विदर्भाला प्रतीक्षा करावी लागत आहे.

Nitin Gadkari : अमरावतीच्या आर्थिक विकासाचा मेट्रोमार्ग कागदी रूळावर रखडला

यावर निकाल झटपट लागले अशी अपेक्षा केली जात होती. मात्र ती आता लांबणीवर पडली आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. मात्र तो पर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून महापालिकेची निवडणूक घेण्यात आली आहे. न्यायालयाने आरक्षणाच्या मर्यादेची कडक अंमलबजावणी करणयाचे आदेश दिल्यास काही जागांवर पोट निवडणूक घ्यावी लागू शकते.

राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली होती. रश्मी बर्वे आणि मुक्ता कोकड्डे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. यापैकी रश्मी बर्वे यांना काँग्रेसने लोकसभेची तिकीट जाहीर केले होते. मात्र जात पडताळणी समितीकडे त्यांच्या जात वैधतेस आव्हान देण्यात आले होते.

Akola RTO : अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय टाकणार कात; १५ कोटींच्या विकासकामांना लवकरच सुरुवात

त्यामुळे काँग्रेसने उमेदवार बदलाला, श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली होती. ते निवडूनसुद्धा आले आहेत. राज्यात ज्‍या पक्षाची सत्ता त्याची जिल्हा परिषद असेच निकाल आजवर नागपूर जिल्हा परिषदेत लागले आहे. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाजपला या निवडणुकीची घाई झाली आहे.

error: Content is protected !!