Breaking

Youth congress : पदमुक्त युवक काँग्रेस पदाधिकारी दिल्लीत जाणार

Youth Congress leaders will appeal to party chief for justice : अंतर्गत वाद चांगलाच पेटला; पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार

Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनादरम्यान अनुपस्थित राहिल्याने युवक कॉंग्रेसमध्ये गदारोळ झाला. ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले. आता या प्रकारावरून उचलबांगडी झालेले पदाधिकारी संतापले असून त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्याची भूमिका घेतली आहे.

एकूणच या प्रकरणावरून युवक कॉंग्रेसमधील राजकारण तापले असून त्याचा फटका संघटनेला बसण्याची चिन्हे आहेत. रविवारी संघ मुख्यालयाचा घेराव घालण्यासाठी देवडिया भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. त्यात अनेक पदाधिकारी पोहोचलेच नाहीत. या आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील वाद समोर आला. या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले.

Child sexual abuse: अश्लील चाळ्यांसाठी शिक्षक रविवारी घ्यायचा वर्ग

मात्र, आंदोलनात ५० पेक्षा कमी कार्यकर्ते सहभागी झाले. बहुतांश प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागीच झाले नाहीत. ज्या अपेक्षेने हे आंदोलन पुकारण्यात आले होते तसा माहोल युवक काँग्रेसला तयार करता आला नव्हता. या सर्व घटनाक्रमाची गंभीर दखल घेण्यात आली व सोमवारी सुमारे ६० पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे पत्र जारी केले. कारवाई झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, आदीचा समावेश आहे. या सर्वांमध्ये संतापाची लाट आहे.

Collectorate of Buldhana : गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे यांनी घटनाक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईपूर्वी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. आम्ही स्वत: विदेशात आहोत. रविवारी एवढे मोठे आंदोलन करायचे होते व एक दिवसापूर्वी शनिवारी झूम मीटिंगवर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. अनेकांना या झूम मीटिंगचेही निरोप मिळाले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करीत आहोत. मुळात ही कारवाई हेतूपुरस्परपणे करण्यात आली आहे. आम्ही पक्षश्रेष्ठींकडे दाद मागू, असे त्यांनी स्पष्ट केले.