Prataprao Jadhav : प्रतापराव जाधवांचं चाललंय काय? महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह!

prataprao-jadhav-dilip-sananda-political-moves-clashes-in-mahayuti : भाजपला डावलून व्यापाऱ्यांशी संवाद, सानंदांशी वाढली जवळीक

Khamgao मतदारसंघात खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अलीकडे वाढविलेली राजकीय सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या काही हालचाली महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची कुजबुज स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाढीव कराच्या मुद्द्यावर खामगावात व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे जाधव यांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागली आहे.

बैठकीदरम्यान जाधव आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यातील वाढती जवळीक विशेष चर्चेत राहिली. सानंदा सध्या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाशी संबंधित असतानाही त्यांच्याशी असलेले जाधव यांचे सलोख्याचे संबंध भाजपमधील काही नेत्यांना अस्वस्थ करत असल्याचे बोलले जाते.

March End : ‘मार्च एंड’चा ताण वाढला; २४ कोटींच्या निधीसाठी आमदारांची धावपळ!

दरम्यान, लाखनवाडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये मेळावा घेऊन विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना आपल्या गटात प्रवेश देत जाधव यांनी संघटनात्मक बळकटी वाढविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. विशेषतः भाजपचा पारंपरिक प्रभाव असलेल्या भागांत हालचाली वाढल्याने महायुतीतील अंतर्गत समन्वयावर परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांच्या या सक्रियतेमागील नेमकी रणनीती काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.