Only-one-tehsil-office-for-50-lakhs-population-nqgpur-city : माजी मंत्र्याने उपस्थित केला प्रश्न, नागरिकांची होतेय गैरसोय
Nagpur नागपूर हे उपराजधीनीचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या ५० लाखांच्या घरात गेली आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र असे असताना एकाच तहसील कार्यालयाच्या भरोशावर शहराचा करभार हाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. हे बघता मुंबईप्रमाणे विधानसभा मतदारसंघनिहाय नागपूर शहरात सहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूर शहरातील प्रशासकीय सुविधांबाबत डॉ. नितीन राऊत यांनी सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, नागपूर हे राज्याचे उपराजधानीचे शहर असून येथे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र एवढ्या मोठ्या शहरासाठी सध्या केवळ एकच तहसीलदार कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, महसुली कामे आणि इतर शासकीय सेवांसाठी शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावपळ करावी लागते.
सहा मतदारसंघांची जबाबदारी एकाच कार्यालयावर असल्याने तेथे मोठी गर्दी होत असून अनेक कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांच्या परिसरातच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Dr. Pankaj bhoyar : शालार्थ आयडी घोटाळ्यातील शिक्षकांना तुर्तास पगार नाहीच
राज्य सरकारने राज्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची घोषणा केल्याबद्दल त्यांनी स्वागत केले; मात्र नागपूरसारख्या वाढत्या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाचे विकेंद्रीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही डॉ. राऊत यांनी यावेळी सरकारकडे केली.








