NCP Sharad pawar : ‘शासनाची कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांची दिशाभूल’, शरद पवार गटाचा आरोप

maharashtra-government-loan-waiver-announcement-is-fake-NCP-alleges : ३१ मार्चपर्यंतच्या संपूर्ण थकीत कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

Buldhana राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी दिलासा नसून दिशाभूल करणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देऊन त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र टीका केली.

निवेदनात शेळके यांनी नमूद केले की, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी घालून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Budget session 2026 : नोकरभरतीतील परीक्षा शुल्कात ५० टक्के कपातीची मागणी; विधानसभेत आमदारांनी वेधले सरकारचे लक्ष

या योजनेत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जालाच पात्रता देण्यात आली आहे. ही तारीख निश्चित करण्यामागचे कारण शासनाने स्पष्ट केलेले नाही. प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांचे पीककर्ज ३१ मार्च २०२६ नंतरच थकीत ठरणार असल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही शेळके यांनी केला.

Sandip Shelke : “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” म्हणत ठाकरेंचा सेनापती काँग्रेसमध्ये!

शासनाने कोणतीही अट न ठेवता ३१ मार्च २०२६ पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.