Devendra Fadnavis : २०० फूट उंच भारतीय ध्वज, दिमाखात फडकला तिरंगा!

200-feet-national-flag-tiranga-inaugrated-by-devendra-fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्राभिमानाचे ठरेल प्रतिक

Nagpur देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या बलिदानाची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिकेने साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय ध्वजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिमाखात लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, परदेशात त्या-त्या देशांचे भव्य राष्ट्रध्वज दिमाखात फडकताना दिसतात. भारतातही राष्ट्रभिमान जागविण्यासाठी असे ध्वज उभारले जावेत अशी मागणी होत असे. मात्र पूर्वी ‘फ्लॅग कोड’च्या तांत्रिक अडचणी येत होत्या. आता त्या अडचणी दूर झाल्याने देशभरात असे भव्य राष्ट्रध्वज उभारले जात आहेत.

Uday samant : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा लेखाजोखा जाहीर होणार !

नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारलेला हा ध्वज प्रत्येक नागपूरकराचा अभिमान जागविणारा असून त्याचे आरेखन अतिशय उत्तम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागपुरातून अन्य राज्यांकडे जाणाऱ्या शहरांची प्रतीकेही येथील भिंतींवर साकारण्यात आली असून, हा परिसर बघून देशाभिमानाने ऊर भरून येतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, त्यानंतर त्यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाचे लोकार्पण केले. या प्रकल्पाची संकल्पना २००९ मध्ये मांडण्यात आली होती आणि २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते. वास्तुविशारद शांतनू भाल्ला यांनी या भव्य प्रकल्पाचे डिझाइन केले आहे.

Mahayuti Government : कष्टकऱ्यांचे संरक्षण आणि सुरक्षित डिजिटल महाराष्ट्र; सरकार घेणार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय

या सोहळ्याला आमदार संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, महापौर नीता ठाकरे, प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ. विजय दर्डा यांनी केले.