Kiran Mahalle : माजी महापौरांचे पुनर्वसन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर नियुक्ती

Former-Mayor-amravati-Kiran-Mahalle-appointed-as-a-member-of-the-National-Commission-for-Backward-Classes : किरण महल्ले वाढदिवसाच्याच दिवशी स्वीकारणार पदभार

Amravati अमरावतीच्या माजी महापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयातून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. किरण महल्ले आज, गुरुवार, १९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे हा पदभार स्वीकारणार आहेत.

महल्ले यांनी यापूर्वी १९९७ साली अमरावतीच्या महापौरपदाची धुरा सांभाळली होती. त्याआधी त्यांच्या नेतृत्वाखाली राधानगर परिसरातील मद्यविक्रीचे दुकान हटवण्यासाठी प्रभावी आंदोलन उभारण्यात आले होते, ज्याची त्या काळात मोठी दखल घेण्यात आली होती. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

Lanke Vs Vikhe : खा. निलेश लंकेंचा विखे पाटील कुटुंबावर १०० कोटींच्या व्यवहारांचा गंभीर आरोप!

सध्या भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी मानले जाते. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, १९ मार्च हा किरणताई महल्ले यांचा वाढदिवस आहे. १९९७ मध्ये याच दिवशी त्यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली होती आणि आता पुन्हा याच दिवशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्यत्व मिळाल्याने ही तारीख त्यांच्या आयुष्यातील भाग्यशाली क्षण ठरली आहे.