व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘विचित्रा… सॉरी चित्रा ताई’; यशोमती ठाकूर यांचा खोचक टोला

‘विचित्रा… सॉरी चित्रा ताई’; यशोमती ठाकूर यांचा खोचक टोला

सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध पेटले; बाजार समितीवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

Amravati राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच रंगला आहे. ‘विचित्रा सॉरी चित्रा ताई’ असा खोचक टोला लगावत यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. अमरावती खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणावरून सुरू झालेल्या या वादाला आता सोशल मीडियावरही हवा मिळाली असून, दोन्ही नेत्यांच्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘अभ्यास करून बोला’; यशोमती ठाकूर यांचा चित्रा वाघ यांना सल्ला

यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यावर टीका करत अमरावती खरेदी-विक्री संघ आणि बाजार समितीच्या निवडणुकीचा संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरेदी-विक्री संघ आणि बाजार समितीची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्यात पहिल्यांदाच आघाडीची सत्ता स्थापन झाली. मात्र, खरेदी-विक्री संघ भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर तो ब्लॅकलिस्ट झाला, असा आरोप त्यांनी केला.

दिवाळी अंधारात; ८२ हजार शेतकऱ्यांना भाजप सरकारने दाखविला ठेंगा!

‘डियर ताई, अभ्यास करून आणि माहिती घेऊन मगच बोला,’ अशा शब्दांत त्यांनी चित्रा वाघ यांना सुनावले. बाजार समितीत आपले पॅनल पूर्ण बहुमताने निवडून आले असतानाही भाजपने रडीचा डाव खेळून ते बरखास्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना यशोमती ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खोटे बोलणे आणि तेच ठामपणे रेटून सांगणे चांगले जमू लागल्याचा टोला लगावला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अमरावतीतील स्थानिक राजकारणातून सुरू झालेला हा वाद आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशा राजकीय संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांच्या टीका-टिप्पणीचे व्हिडिओ आणि त्यातील विधानांवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असून, यशोमती ठाकूर आणि चित्रा वाघ यांच्यातील हा शाब्दिक सामना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

error: Content is protected !!