New-bungalow-worth-₹3.5-crore-ready-for-the-Zilla-Parishad-President : जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी साडेतीन कोटींचा नवा बंगला तयार
Amravati जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असून सध्या प्रशासनिक राजवट सुरू आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मालटेकडी परिसरात, झेडपी विश्रामगृहाजवळ तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा आलिशान बंगला उभारला आहे. निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा असताना हे शासकीय निवासस्थान सज्ज झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून, लवकरच जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या सदस्यांमधून नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आधीच तयारी पूर्ण केली असून नव्या अध्यक्षांना कोऱ्या बंगल्याची भेट मिळणार आहे.
Unseasonal rain : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा राज्यभर कहर, शेतकरी चिंतेत
जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने आगामी अध्यक्ष महिला असणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३ कोटी ३९ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीतून बांधलेला हा बंगला अध्यक्षांना निवासासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सध्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत असलेला जुना अध्यक्षीय बंगला उपाध्यक्ष व चार सभापतींसाठी वापरात येण्याची शक्यता आहे.
या बंगल्याचा ठराव २० ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. सुरुवातीला २ कोटी ५३ लाख रुपये मंजूर होते. मात्र खर्च वाढल्याने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ७८.६५ लाख रुपयांची वाढ करून एकूण खर्च ३ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपये करण्यात आला. चार सभापतींच्या बंगल्यांची डागडुजीही सुरू असून, यासाठीही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
Raj thackeray : सरकारने तुम्हाला इन्स्टाग्राममध्ये अडकवून ठेवलेय, राज ठाकरेंचा हल्लाबोल
असा असेल बंगला?
एकूण क्षेत्रफळ : ६०४.२८ चौ.मी.
भुईमजला : ३७१.५० चौ.मी.
पहिला मजला : २३२.७८ चौ.मी.
दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र अभ्यागत कक्ष व सभागृह
बांधकाम पूर्ण; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात








