Controversy in the election of the Akola District Central Cooperative Bank : उमेदवारी माघारीवर दबावाचा आरोप; प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
Akola अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी माघारीवर दबाव आणल्याचे गंभीर आरोप समोर आले असून, या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकार विभागाच्या भूमिकेवरही टीका होत आहे.
पगारदार मतदारसंघातून अध्यक्ष व संचालक पदाचे उमेदवार संतोष कोरपे यांच्या विरोधात उभे असलेले प्रा. अतुल पिलात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची नोंद आहे. मात्र, ही माघार दबावाखाली घेतली गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असताना सायंकाळी ५.४५ वाजता अर्ज माघारीची प्रक्रिया कशी पार पडली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Adinath maharaj : अहिल्यानगर हादरले, स्वतःहून जननेंद्रियाचा त्याग केल्याची महंतांची कबुली
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांनी मात्र, “निर्धारित वेळेतच अर्ज माघारी घेण्यात आला असेल,” असा दावा केला आहे. तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, २१ संचालक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत १० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर ५५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १० मतदारसंघांत प्रत्येकी एकच उमेदवार उरला. अंतिम यादीत २३ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Satara zp election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून विधानसभेत संताप
या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सत्य समोर आणावे, अशीही मागणी व्यक्त होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत निवडणुका दबावाखाली होऊ लागल्यास ही चिंताजनक बाब असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागाने कठोर आणि पारदर्शक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








