Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज: विधानसभेत मुनगंटीवारांचा ‘परिणामकारक’ लढा

Sudhir Mungantiwar’s constant attempts for Chandrapur district development : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील ९ हजार ५९७ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

Chandrapur चंद्रपूर जिल्ह्याचा विकास हा केवळ कागदावरचा विषय नसून तो विधानसभेच्या सभागृहात अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडला जाणारा एक मिशन आहे. या मिशनचे नेतृत्व करत आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार. प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं मिळवून देण्यावर त्यांचा भर असल्यानेच आज चंद्रपूरच्या कानाकोपऱ्यात परिवर्तनाची लाट पाहायला मिळत आहे.

सामान्य माणसाच्या आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. याचेच फलित म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ५९७ कुटुंबांना हक्काचे घर मिळण्यासाठी तब्बल ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केवळ घरेच नाही, तर चंद्रपूरच्या पर्यावरणाचाही त्यांनी तितक्याच आक्रमकतेने विचार केला. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई आणि झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा विषय त्यांनी राज्याच्या केंद्रस्थानी आणला. नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या पहिल्याच प्रस्तावात या नद्यांचा समावेश करण्याचे आश्वासन मिळवून त्यांनी चंद्रपूरच्या शाश्वत विकासाची पायाभरणी केली आहे.

Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

शिक्षण, आरोग्य, सिंचन आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच आघाड्यांवर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा विडा उचलला आहे. नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी १४५ कोटींचा निधी असो किंवा रिंग रोडचा प्रश्न, त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आज चंद्रपूर जिल्हा राज्याच्या विकासाच्या नकाशावर ठळकपणे उमटला आहे. हा केवळ राजकीय प्रवास नसून, चंद्रपूरकरांच्या विश्वासाचा एक भक्कम आधार आहे.

शेती आणि उद्योगांना नवसंजीवनी
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एकार्जुना येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन प्रकल्प मंजूर करून त्याला प्रकल्पाला गती देणे आणि आमडी बॅरेज प्रकल्पाद्वारे २,६४२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी बैठक घेणे, हे आ. मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवते. दुसरीकडे, विदर्भातील उद्योगांना वीज दरात सवलत मिळावी यासाठी ५५० कोटींच्या निधीची मागणी करत त्यांनी औद्योगिक विकासाला बळ दिले. विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना ८० टक्के रोजगार मिळावा, ही त्यांची मागणी भूमिपुत्रांच्या हिताचे रक्षण करणारी ठरली आहे.

अर्थसंकल्पात घोषणा
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम झायलेरियम उभारण्याच्या मागणीला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. चंद्रपूरच्या सागवान वारशाचे जतन, संशोधन व जनजागृतीसाठी उभारला जाणारा हा प्रकल्प पर्यटन, वनसंपदा अभ्यास आणि स्थानिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असून, विधानसभेत अर्धा तास चर्चेद्वारे मांडलेल्या या मागणीचा मुनगंटीवार यांच्या संसदीय पाठपुराव्यामुळेच मार्ग मोकळा झाला आहे.

पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसा
चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे मार्गाचा विकास, तृतीय रेल्वे लाईन आणि स्थानकांचे आधुनिकीकरण यासारख्या कामांना त्यांनी गती दिली. विशेष म्हणजे, रेल्वेलाईन लगतच्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने हाताळला. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.सामाजिक स्तरावर, राजमाता राणी हिराई यांच्या जन्मोत्सवाला शासकीय स्तरावर कार्यक्रम घेण्याची मान्यता मिळवून देऊन त्यांनी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाला सन्मान मिळवून दिला.

Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

नो कॉम्प्रोमाइज कार्यशैली
मुनगंटीवार यांची खरी ओळख त्यांच्या आक्रमक कार्यशैलीत आहे. विधानसभेत दिलेली आश्वासने पाळली जात नसतील, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात ते मागे हटत नाहीत. विधानसभेतील आश्वासने हे लोकशाहीचे धारदार अस्त्र आहे, असे मानून त्यांनी प्रशासनाला नेहमीच उत्तरदायी ठेवले आहे.