Ram Navmi celebration : रामनवमीच्या ६२ मिरवणुका, २३५० पोलिस तैनात

62 yatra for ram navami in akola, police alert : अकोल्यात कटेकोड सुरक्षा, संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

Akola रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, एकूण ६२ मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील अकोला शहरात एक मुख्य व २५ लहान मिरवणुका काढण्यात येणार आहेत. याशिवाय अकोट, हिवरखेड, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि माना या ठिकाणीही प्रमुख मिरवणुका होणार असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. अकोला, अकोट आणि मूर्तिजापूर येथे मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवासाठी अप्पर पोलिस अधीक्षक १, उपविभागीय पोलिस अधिकारी ४, पोलिस निरीक्षक २३, दुय्यम अधिकारी १२८ आणि तब्बल २३५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीएफची १ कंपनी, ९०० होमगार्ड, आरसीपीची ४ पथके आणि स्ट्रायकिंग फोर्सची ५ पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अशोक खरात वयाने मोठे असल्यामुळे…’

मिरवणुकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ८ वॉच टॉवर, १ ड्रोन आणि २८ व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. अकोला शहरात १९७ तर अकोटमध्ये १६८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, पीए सिस्टीमद्वारे नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहेत. जय हिंद चौक, बियाणी चौक आणि कोतवाली चौक येथे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. पोलिस विभागाने मिरवणूक आयोजक व शांतता समिती सदस्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. आक्षेपार्ह बॅनर्स, होर्डिंग्ज किंवा धार्मिक भावना दुखावतील असे प्रकार टाळण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

मागील गुन्हे नोंदींच्या आधारे २४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ जणांना कलम १४४ अंतर्गत नोटीस देऊन मिरवणूक कालावधीत जिल्ह्याबाहेर पाठविण्याची कारवाई करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस, दामिनी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. चेन स्नॅचिंग, चोरी आणि छेडछाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

Ashok kharat case : कस्तुरी, जडीबुटी आणि बनावट रत्न खरेदीचा संशय

मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, वाहतूक वळविणे, फिक्स पॉईंट्स आणि पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच सामाजिक ऐक्य, शांतता आणि सौहार्द जपत उत्सव साजरा करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.