Displeasure in Tirkhedi due to not getting chairman post : पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केल्याचा आरोप; कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस
Salekasa पंचायत समिती सभापती – उपसभापती निवडणुकीत शेवटपर्यंत आश्वासन दिले. आणि ऐनवेळी दुसऱ्या टर्ममध्येसुद्धा तिरखेडी जिल्हा परिषद क्षेत्राला डावलण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सभापतिपदाची हुलकावणी अन् तिरखेडी क्षेत्रात नाराजी असेच चित्र आहे.
सालेकसा तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद क्षेत्रांचा समावेश आहे. दोन टर्ममध्ये प्रत्येक जि.प. गटाला सभापती किंवा उपसभापतिपद देण्यात येईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. पण झालिया आणि पिपरिया क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्यांना सभापती व उपसभापतिपद मिळाले. तर कारूटोला गटाला दोन टर्ममध्ये दोन्ही पद लाभले. मात्र तिरखेडी गटाला दुसऱ्या टर्ममध्येसुद्धा कोणतेही पद मिळाले नाही. तिरखेडी जि.प. क्षेत्रात कावराबांध आणि तिरखेडी असे दोन पंचायत समिती गण आहे. कावराबांध क्षेत्रात भाजपच्या अर्चना मडावी पं.स. सदस्या आहेत. तर तिरखेडी क्षेत्रात काँग्रेसच्या रेखा फुंडे पं.स. सदस्या आहेत. तिरखेडी गटात पद मिळाले असते तर रेखा फुंडे यांना संधी मिळाली असती.
Gondia police : शिवमहापुराण कथा समारोप कार्यक्रमात खुनाचा प्रयत्न!
रेखा फुंडे आणि वीणा कटरे प्रबळ दावेदार मानले जात होते. यात रेखा फुंडे यांना सभापतिपद देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी वीणा कटरे यांच्या नावाची घोषणा करून त्यांना अर्ज करायला सांगितले. रेखा फुंडे यांनी पक्षनिष्ठा दाखवून बंडखोरी न करता वीणा कटरे यांना मतदान केले. उपसभापतिपदी सुनीता राऊत यांची वर्णी लावण्यासाठी जि.प. सदस्या गीत लिल्हारे यांनी प्रयत्न केले. परंतु सभापती महिला, तर उपसभापती पुरुष असे सूत्र निश्चित करण्यात आले. जितेंद्र बल्हारे यांची उपसभापती वर्णी लागली.
सभापतिपदी रेखा फुंडे यांना संधी मिळावी म्हणून जि.प. सदस्या वंदना काळे यांनी प्रयत्न केले. परंतु पक्षाच्या निवडणूक पर्यवेक्षकांनी वीणा कटरे आणि जितेंद्र बल्हारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे तीन जि.प. सदस्या व पंचायत समिती सदस्य तसेच पक्ष कार्यकर्ते संतापले आहेत, तर यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुढे आली आहे.
Local body elections: नागपुरातून येणाऱ्या लिफाफ्यात कुणाचे नाव?
सभापतिपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु काही लोकांनी मला डावलून अन्याय केला आहे, अशी प्रतिक्रिया रेखा फुंडे यांनी दिली आहे.