Bacchu Kadu : केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार मोर्चा!

Protest march to storm the residence of the Union Agriculture Minister demanding MSP for farmers : ९ ऑगस्टला हमीभावासाठी लढा देणार, बच्चू कडूंची घोषणा

Amravati शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला नवा आणि सकारात्मक अर्थ देत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात आज रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या शेतकरी ऐक्याला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला महादेव जानकर, विजय जावंधीया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत, शेतकरी प्रश्नांवर पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली.

Sushma andhare : सुषमा अंधारेंचा मोठा आरोप; ‘मी टू’ प्रकरणात अनु मलिकला क्लीन चिट !

 

यावेळी कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची सेवा करणारे, थकलेल्या आंदोलकांची काळजी घेणारे संजय गोमकाळे यांची बिजतुला करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे आंदोलनातील निस्वार्थी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. “आंदोलनात रक्त सांडले, पण लढा थांबला नाही. समाजाला जाती-धर्मात अडकवले जात असताना शेतकरी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

CM on zirwal viral video : “सत्यता तपासूनच निर्णय” देवेंद्र फडणवीसांची भूमिका

ते पुढे म्हणाले, “ही कर्जमाफी हा संघर्षाचा परिणाम आहे. आम्ही गांधीगिरीने लढायचे ठरवले आहे, पण गरज पडल्यास भगतसिंगगिरीनेही पुढे जाऊ. स्वतःचे घर नसले तरी ज्यांचे घर जळाले त्यांचे घर उभारण्याची भावना या लढ्यात आहे.” या संघर्षामुळे दिव्यांग, घरकुल आणि शेतमजूर योजनांमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. या उपोषणाच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नांवर लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

“ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठं केलं त्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं,” असे म्हणताना बच्चू कडू भावूक झाले. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.