Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे 100 तक्रारी, त्यात 70 टक्के महिलांच्या!

ashok-kharat-case-over-100-complaints-70-percent-women-hawala-angle-maharashtra : लैंगिक शोषण, फसवणूक आणि हवाला रॅकेटच्या संशयाने तपासाची व्याप्ती वाढली

Mumbai : भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत फोनद्वारे 100 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी सुमारे 70 टक्के तक्रारी महिलांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र लेखी तक्रार देण्यासाठी महिलांचा प्रतिसाद अपेक्षेइतका मिळत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात एसआयटीकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून त्याद्वारे पीडित महिलांना तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकारी तक्रारदारांना सुरक्षिततेची हमी देत लेखी तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करत असले तरी अनेक महिला पुढे येण्यास अजूनही धजावत नसल्याचे चित्र आहे.

Electricity tariff cut : घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा, कोणतीही दरवाढ नाही!

 

अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. शुक्रवारी उशिरा दोन नवीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून एका महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा समावेश आहे. नेवासा येथील एका व्यावसायिकाला व्यवसायिक प्रगतीच्या नावाखाली लाखो रुपयांच्या अंगठ्या विकून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वैवाहिक वाद सोडवण्यासाठी आलेल्या एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

तपासादरम्यान खरातच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे सांगत महिलांना भीती दाखवून लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. नकार दिल्यास कुटुंबावर संकट येईल अशी धमकी देत तो महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे पीडितांनी सांगितले आहे.

Modi meeting with cm : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

 

या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहाराचाही तपास सुरू असून हवाला रॅकेटचा धागादोरा समोर येत आहे. परदेशात, विशेषतः दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू असून काही प्राथमिक पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ लैंगिक शोषण किंवा फसवणुकीपुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची ओळख उघड करणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्या 74 हून अधिक व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकसह विविध ठिकाणी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील अनेक खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

https://sattavedh.com/farmers-relief-maharashtra-heavy-rain-farmers-relief-livestock-compensation-new-rule

अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून त्यात लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून तपास यंत्रणांवरही दबाव वाढला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय व्यक्तींवरही आरोप होत असून त्यात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले असून या प्रकरणातील चौकशी पुढे काय वळण घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.