Chandur railway Municipal council : नगराध्यक्ष आल्याशिवाय लग्न करणार नाही; नवरदेवाचा हट्ट

Groom insists he won’t marry until the Municipal Council President arrives : नगर परिषदेतच थांबली वरात, कर्मचाऱ्यांचा उडाला गोंधळ

Chandur railway लग्न म्हटलं की आनंद, गडबड आणि थोडीफार धावपळ ओघाने येतेच; मात्र चांदूर रेल्वे येथे एका नवरदेवाच्या आगळ्यावेगळ्या हट्टामुळे लग्नसोहळ्याने वेगळाच रंग घेतला. “शहराच्या प्रथम नागरिकाशिवाय माझं लग्न होणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत नवरदेव थेट नगर परिषदेत ‘बारात’ घेऊन पोहोचल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

शेख ईशाद शेख इस्राईल (रा. मासोद, ता. कारंजा) यांचा विवाह सावंगी मग्रापूर येथील कैफिया आजमी मन्नान बेग यांच्यासोबत ठरला होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडपात पाहुण्यांची गर्दी जमली होती; मात्र नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा या अद्याप पोहोचल्या नव्हत्या. त्यांची प्रतीक्षा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नवरदेवाने वेगळाच निर्णय घेतला.

Ashok Kharat case : ‘बुवांच्या आशीर्वादात अडकले नेते’; सत्यपाल महाराजांची मिश्कील टोलेबाजी

नवरदेवाने आपले भाऊ डॉ. हनिफ हफिज शेख आणि नातेवाइकांसह थेट नगर परिषद कार्यालय गाठले. “नगराध्यक्ष आमच्यासोबत आल्याशिवाय लग्न लावणार नाही,” असा हट्ट धरत तो तेथेच ठाण मांडून बसला. अचानक आलेल्या या ‘बारातीं’मुळे नगर परिषदेत एकच खळबळ उडाली.

शेवटी नवरदेवाचा आग्रह मान्य करत नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांनी आपली कामे बाजूला ठेवली आणि पती नगरसेवक नीलेश विश्वकर्मा यांच्यासह नवरदेवासोबत मंडपाकडे रवाना झाल्या. त्यांच्या उपस्थितीतच लग्नसोहळा पार पडला.

Industrial development : ‘आश्वासनांचे कारखाने’ तेजीत; प्रत्यक्ष उद्योग मात्र अजूनही प्रतीक्षेत

दरम्यान, डॉ. हनिफ हफिज शेख हे नगराध्यक्षांच्या पतींचे मित्र असल्याची माहिती समोर आल्यानंतर नवरदेवाचा हट्ट गैरवाजवी नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र या अनोख्या प्रसंगामुळे लग्नसोहळा आणि नगर परिषद परिसर दोन्ही ठिकाणी रंगतदार चर्चा रंगली असून, “नगराध्यक्षांशिवाय नाही लग्न” ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.