Ashok Kharat case : खरातकडे २ हजार कोटींची माया; मंत्रालयातील अनेकांचे काळे धन पांढरे करण्याचा ‘अड्डा’?

Vijay Wadettiwar alleges that Ashok Kharat is running a hub for converting black money into white for many in the Mantralaya : वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप, खरातच्या मोबाईलमध्ये दिग्गजांची नावे

Nagpur भोंदू अशोक खरात याच्या फाईलमधून आता अनेक बड्या धेंडांची नावे समोर येऊ लागल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. खरातकडे उघड झालेली कोट्यवधींची मालमत्ता आणि त्याच्या मोबाईलमध्ये मिळालेली सांकेतिक (कोड वर्ड) नावे पाहता, तो केवळ भोंदूगिरीच नाही, तर बड्या लोकांचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत असावा, असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केला.

पोलीस तपासात खरातचा फोन जप्त करण्यात आला असून, त्यात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे कोडमध्ये लिहिली असल्याचे समोर आले आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, जर व्यवहार पारदर्शक असते, तर नावे कोडमध्ये लिहिण्याची गरज काय होती? खरातच्या एका व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण संपणार नाही. कायदे बनवणारी मंडळीच जर कायदे मोडत असतील, तर ते शिक्षेस पात्र आहेत. खरात हे महाराष्ट्राला लागलेले एक मोठे कलंक असून, ही संपूर्ण घटना राज्याची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे.

Operation Tutari : ‘ऑपरेशन तुतारी’ निव्वळ अफवा! मला कोणाचाही फोन आला नाही

खरातच्या संपत्तीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी दावा केला की, ‘आज या भोंदू बाबाकडे सुमारे १५०० ते २००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. इतका मोठा पैसा आला कुठून? या पैशांचा खरा स्रोत शोधणे आवश्यक आहे. मंत्रालयातील अर्ध्याहून अधिक लोकांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी खरातचा वापर केला असावा, अशी दाट शक्यता आहे. या प्रकरणात ज्या सीएने मदत केली, त्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.’

https://sattavedh.com/ashok-kharat-case-chandrashekhar-bawankule-challanges-vijay-wadettiwar-to-provide-eviden

 

विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने हे प्रकरण उजेडात आणले, त्यालाच चाकणकर यांनी नोटीस पाठवली होती, हे संशयास्पद आहे. खरातला मोठे करणारे राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकारी अद्याप कारवाईपासून दूर कसे?” असा सवाल करत, जोपर्यंत या ‘किंगमेकर्स’वर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही चौकशी खरी आहे असे मानले जाणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले. या प्रकरणाच्या खोलाशी गेल्यास राज्यातील अनेक बडे चेहरे उघडे पडतील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.