Breaking

Cyber crime : एम्सच्या डॉक्टरने link वर click केले, लाखो रुपये गायब!

AIIMS doctor clicked on the link, lakhs of rupees disappeared : महिला सहायक प्राध्यापकाची फसवणूक

Nagpur एम्सच्या एका डॉक्टरने“कस्टमर केअर’चा संपर्क क्रमांक गुगलवर शोधला. मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी फोन केला. त्याने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताच डॉक्टरचे बँक खाते रिकामे झाले. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातील १३ लाख ७५ हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडला. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी डॉक्टरच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादी डॉक्टरचे एम्स रुग्णालयात कार्यरत आहेत. एका राष्ट्रियकृत बँकेची शाखा मिहानला आहे. त्या बँकेत त्यांचे खाते आहे. खात्यात रक्कमही होती. त्यापैकी त्यांना आठ लाखांची ‘एफडी’ करायची होती. त्या बँकेत गेल्या आणि आठ लाखांची एफडी केली. मात्र, तेवढी रक्कम खात्यातून कपात झाली नाही. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेथे बँकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.

Kirit Somaiya : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावरून काँग्रेस- भाजप आमने सामने

घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘कस्टमर केअर’ला संपर्क साधण्यासाठी गुगलवर क्रमांक शोधला. मिळालेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. ‘तांत्रिक अडचण होती, लगेच नीट करून देतो,’ अशी बतावणी करीत त्याने त्यांना एक लिंक पाठविली. त्यात ‘एपीके फाईल’ होती. लिंक डाऊनलोड केल्यावर त्यांना भ्रमणध्वनी संचामध्ये काही गडबड झाल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर खूप ‘ओटीपी’ दिसले. त्या घाबरून बँकेत गेल्या आणि विचारपूस केली.

Election commission of India : अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी

त्यावेळी त्यांच्या खात्यातील १३ लाख ७५ हजारांची रक्कम काढल्याची माहिती समोर आली. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या जुन्या ‘एफडी’वर २ लाख ८४ हजार ८१० रुपयांचे कर्जदेखील घेतले. त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस मुकुंद कवाडे यांनी घटनेचे गांभीर्य पाहता लगेच गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. गुन्हा नोंदवून पोलीस तांत्रिक तपास करीत आहेत.