Public representatives lash out at administrative chaos in Mehkar : मेहकर पंचायत समितीची आमसभा: २६ तक्रारींवर तत्काळ निर्णय
Mehkar पंचायत समिती मेहकरच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळाव्यात तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासकीय मंथन करण्यात आले. कृषी वैभव लॉन येथे पार पडलेल्या या सभेत जनता आणि प्रशासन यांच्यातील थेट संवादातून विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात आला.
विशेष म्हणजे, सभेत प्राप्त झालेल्या २६ लेखी तक्रारींवर वस्तुनिष्ठ चर्चा करून त्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले.
तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, प्रशासक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. व्यासपीठावर विविध विभागांचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
Amol mitkari ons naresh arora : अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर गंभीर आरोपांचा भडिमार
सभेच्या सुरुवातीला ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांसह ग्रामपंचायत प्रशासकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या यशोगाथेचीही या सभेत दखल घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ आणि राज्यस्तरीय ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगावच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी प्रोत्साहित करण्यात आले.
Mahayuti government : सरकारमध्ये मंत्र्यांची मंत्रालयात दांडी, खासगी बंगल्यावरून कारभार !
आमसभेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तक्रार निवारण. सभेत एकूण २६ लेखी निवेदने सादर करण्यात आली होती. या तक्रारींचे वाचन करून त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. विशेषतः आगामी उन्हाळा पाहता पाणीटंचाईच्या तक्रारींवर तात्पुरती पर्यायी व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्यावर प्रशासकीय संमती देण्यात आली.
प्रशासकीय अडचणींमुळे विकासकामांत येणारे अडथळे दूर करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न या सभेतून दिसून आला. या आमसभेच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी दिनकर खरात, सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे तसेच पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








