व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती

water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती

Severe water scarcity in 14 villages of Chikhli : १५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, आता विहीर अधिग्रहणावर भर

Chikhli तालुक्यातील १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती होत आहे. गत मोसमात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असतानाही यंदा तब्बल ८५ गावे संभाव्य पाणीटंचाईच्या छायेत आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. परिणामी, यंदाही पाणीटंचाई निवारणासाठी खासगी विहीर अधिग्रहणावर अधिक भर देण्यात येत आहे.

९९ ग्रामपंचायती असलेल्या चिखली तालुक्यातील ८५ गावांमध्ये यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईची झळ जाणवते. मात्र, गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा जानेवारीपर्यंत काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. तथापि, जानेवारीनंतर पाणीपुरवठ्याच्या जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Farmers loan waiver : कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडकले नवे कर्ज, वाटपावर होणार परिणाम

या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या, तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर होत आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या ग्रामपंचायतींकडून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील १५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी दोन गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. येत्या काळात टँकरच्या संख्येत आणखी भर पडण्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारीपासून पाणीटंचाई उद्भवलेल्या तालुक्यातील १२ गावांनी मार्चअखेरपर्यंत विहीर अधिग्रहणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये पळसखेड जयंती, दिवठाणा, पेठ, बोर्गाव वसू, साकेगाव, बोर्गाव काकडे, मंगरूळ (ई), असोला नाईक, उनाडा, आमखेड, गांगलगाव आणि किन्ही सवडत या ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

Khamgao municipal council : करवाढीला अखेर ब्रेक ; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात होणार सुनावणी

तालुक्यातील कोलारा आणि भालगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांनी टँकरसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. आगामी काळात इतरही गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!