व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati university : ‘ते पन्नास दिवस’ वादात विद्यापीठाचा यू-टर्न; राजकीय दबावामुळे अभ्यासक्रमातून...

Amravati university : ‘ते पन्नास दिवस’ वादात विद्यापीठाचा यू-टर्न; राजकीय दबावामुळे अभ्यासक्रमातून कादंबरी वगळली?

U-turn by Sant Gadge Baba Amravati University in the novel controversy : विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ मतांनी निर्णय; ‘सरकारविरोधी’ आरोपांनंतर कारवाई

Amravati लेखक पवन भगत यांच्या ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीभोवती निर्माण झालेला वाद अखेर राजकीय वळणावर जाऊन पोहोचला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे.

विद्वत परिषदेत २३ विरुद्ध ८ मतांनी कादंबरी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी अभ्यास मंडळ आणि ‘बोर्ड ऑफ स्टडीज’ने ही कादंबरी ‘बीए मराठी’ द्वितीय वर्षासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तक्रारीनंतर हा मुद्दा थेट विद्वत परिषदेत गेला आणि अंतिम निर्णय बदलला गेला.

Rahul bondre : ‘ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात’, भाजप-सेनेवर टीका

या प्रकरणाची सुरुवात डॉ. संगीता जगताप यांनी कादंबरीवर ‘भाजप सरकारविरोधी आशय’ असल्याचा आक्षेप घेतल्याने झाली. त्यानंतर हा विषय राजकीय रंग घेत गेला. विरोधकांकडून हा निर्णय “शैक्षणिक स्वायत्ततेवर गदा” असल्याची टीका होत आहे, तर सत्ताधारी विचारसरणीच्या समर्थकांकडून “अभ्यासक्रमात तटस्थता आवश्यक” असल्याचे मत मांडले जात आहे.

परिषदेत कादंबरीवर झालेल्या चर्चेदरम्यान सदस्यांमध्ये स्पष्ट मतभेद दिसून आले. अखेरीस मतदान घेण्यात आले आणि बहुमताच्या जोरावर कादंबरी वगळण्यात आली. या घडामोडीमुळे विद्यापीठातील निर्णय प्रक्रियेवर राजकीय प्रभाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

rahul bondre : राहुल बोंद्रे यांच्या फलकावर चपला मारल्या, महिलांचा रोष

‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी कोरोना काळातील अनुभवांवर आधारित ललित साहित्य कृती आहे. मात्र, तिच्यातील काही संदर्भ सरकारविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे साहित्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय हस्तक्षेप या तीन मुद्द्यांवर हा वाद केंद्रित झाला आहे.

error: Content is protected !!