व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Malkapur APMC : मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘अवैध भाडे’ वसुली; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर...

Malkapur APMC : मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘अवैध भाडे’ वसुली; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Illegal charges allegedly collected from farmers in Malkapur market committee : शेतकरी विनोद निंबोळकर यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानीची आक्रमक भूमिका; समिती कारभारावर प्रश्नचिन्ह

Malkapur कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित अवैध भाडे वसुलीच्या प्रकरणाने आता राजकीय स्वरूप धारण केले असून, समितीच्या कारभारासोबतच सत्ताधारी गटाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेलाड येथील शेतकरी विनोद निंबोळकर यांनी केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला असून, शेतकऱ्यांकडून ‘नियम’ या नावाखाली अवाजवी भाडे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

मका विक्रीसाठी बाजार समितीत आलेल्या निंबोळकर यांच्याकडून ८०० ते १००० रुपयांपर्यंत भाडे वसूल करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजार समितीतील अडते आणि व्यापारी संगनमताने शेतकऱ्यांवर जाचक अटी लादत आर्थिक फटका देत असल्याची चर्चा शेतकरी वर्तुळात रंगू लागली आहे.

Akola Municipal Corporation : ‘स्वच्छता शुन्य आणि वसुली पूर्ण’, बहुत नाइंसाफी है!

या प्रकरणानंतर विरोधकांनी बाजार समितीच्या कारभारावर जोरदार टीका करत सत्ताधारी गटाला थेट लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेमध्येच जर शोषण होत असेल, तर संबंधित जबाबदारांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राजकीय पातळीवर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा स्थानिक राजकारणात अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

Khamgao Congress : काँग्रेसपुढे गटबाजीचे ‘टेंशन’, कसे साधणार ‘सृजन’?

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांनी थेट बाजार समितीत धडक देत प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे समिती परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.“शेतकरी राबून पीक घेतो आणि विक्रीसाठी आल्यावरच त्याची लूट होत असेल, तर ही बाजार समिती नेमकी कुणासाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत समिती प्रशासनावर हल्लाबोल केला.

error: Content is protected !!