17 inefficient MSRTC officials still free; probe committee’s work progressing slowly : चौकशीचे काम विभागून देताना समिती सदस्यांना अडचणी येत असल्याची तक्रार
Akola महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार व इतर गंभीर आरोप असलेल्या १७ अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधातील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली पाच सदस्यीय समिती अपुरी आणि अपूर्ण असल्याने तपास प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर नेमका कोणत्या राजकीय नेत्यांचा हात आहे व त्यांना कोण अभय देत आहे याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र विविध विभागांशी निगडित असल्याने चौकशीचे काम विभागून देताना समिती सदस्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे चौकशीला अपेक्षित वेग मिळत नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने यापूर्वीच शासनाकडे या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर समिती स्थापन झाली; परंतु ही समिती सर्वसमावेशक नसल्याने चौकशी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, “महामंडळाला प्रत्यक्ष फलनिष्पत्ती हवी असेल, तर केवळ दिखाऊ चौकशी न करता सर्व विभागांतील जाणकार अधिकाऱ्यांचा समावेश असलेली सक्षम आणि सर्वसमावेशक समिती नेमणे आवश्यक आहे.”
Akola Municipal Corporation : ‘स्वच्छता शुन्य आणि वसुली पूर्ण’, बहुत नाइंसाफी है!
त्यांनी पुढे नमूद केले की, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी न देता वर्षानुवर्षे वेतन दिले जात आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळासाठी ही बाब गंभीर असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी समितीला निश्चित कालमर्यादा द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.








