व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation lotus : ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन लोटस’, बुलढाण्यात खळबळ

Operation lotus : ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन लोटस’, बुलढाण्यात खळबळ

After ‘Operation Tiger’, ‘Operation Lotus’ becomes active in Sindkhed Raja : पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली, शिवसेनेसह इतर पक्षांनी घेतला धसका

Buldhana चिखलीतील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेची धग अद्याप ओसरलेली नसतानाच आता बुलढाण्यात ‘ऑपरेशन लोटस’च्या हालचालींनी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडवली आहे. अचानक वेग घेतलेल्या या घडामोडींमुळे पडद्यामागे मोठे राजकीय समीकरण आकार घेत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांची बुलढाणा भेट वरकरणी नियमित कार्यक्रमापुरती मर्यादित वाटत असली, तरी त्यांच्या दौऱ्याची चाहूल आठवडाभर आधीच लागली होती. त्यामुळे हा दौरा केवळ औपचारिक नसून नियोजनबद्ध राजकीय हालचालींचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

कार्यक्रमानंतर झालेल्या सांत्वन भेटी, विश्रामगृहातील कथित खलबते आणि दबक्या आवाजातील बैठका यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात या भेटींचा अर्थ शोधला जात असून, स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणांमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने या हालचालींकडे पाहिले जात आहे.

Buldhana Politics : विरोधकांमुळे विकासकामांत अडथळा, सत्ताधारी विरोधकांवर उलटले!

बुलढाणा नगरपालिकेतील सध्याचे गणित पाहता ३३ सदस्यांचा प्रभावी गट विरुद्ध भाजप ‘एकटा’ असे चित्र दिसत असले, तरी पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली या अंकगणिताला आव्हान देणाऱ्या ठरू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. भाजपकडून योग्य वेळ साधत ‘खेळ पालटण्याची’ रणनीती आखली जात असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून दिले जात आहेत.

विशेष म्हणजे, जिल्हाध्यक्षांनी “वेळ आल्यावर सांगू” असे म्हणत दिलेला गूढ इशारा हा केवळ साधा राजकीय प्रतिसाद नसून आगामी घडामोडींचा सूचक संदेश मानला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नगरपालिकेच्या सत्ताकारणात काही अनपेक्षित वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Uddhav Balasaheb Thackeray : संघटना बळकट करण्यासाठी ठाकरेंचा पक्ष रस्त्यावर उतरणार!

चिखलीतील ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता बुलढाण्यात ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा रंगू लागल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, कोण कुणाच्या संपर्कात आहे, कोणत्या गटात हालचाल सुरू आहे आणि सत्तेचे नवे गणित काय उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!