Ruling party alleges that development works have been stalled due to obstruction by the opposition : ‘ठोस तांत्रिक पुरावे द्या, केवळ राजकारण नको’; पत्रकार परिषदेतून आव्हान
Sindkhedraja ऐतिहासिक नगरीचा कायापालट करण्यासाठी शहरात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे सुरू असताना, विरोधकांकडून राजकीय द्वेषातून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने पत्रकार परिषदेतून केला. सर्व कामे पारदर्शक पद्धतीने सुरू असून कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे स्पष्ट करत विरोधकांचे आरोप फेटाळून लावण्यात आले.
पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत सत्ताधाऱ्यांनी सांगितले की, संबंधित काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) तांत्रिक देखरेखीखाली सुरू आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : संघटना बळकट करण्यासाठी ठाकरेंचा पक्ष रस्त्यावर उतरणार!
रॉक एक्स्कॅव्हेशन आणि पाइपलाइनचे मोजमाप त्रयस्थ संस्थेमार्फत तपासले जात असून निकृष्ट कामाला मंजुरी मिळण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले. मोजमाप पुस्तिका अभियंत्यांमार्फत भरली जाते आणि त्यात राजकारणाला कोणतेही स्थान नसते, असेही स्पष्ट करण्यात आले.यावेळी विरोधकांना “केवळ आरोप न करता ठोस तांत्रिक पुरावे सादर करावेत” असे थेट आव्हान सत्ताधारी गटाने दिले.भुयारी गटार योजनेवर होत असलेल्या टीकेलाही सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला अपयशी ठरवणे चुकीचे असून, रस्ते उकरल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हा तात्पुरता असल्याचे सांगण्यात आले. रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली असून शहर स्वच्छतेच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले.पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे ब्लीचिंग पावडर आणि अन्य साहित्य शासनाच्या निकषांनुसार नामांकित कंपन्यांकडून निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी केले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Nashik it case : कॉर्पोरेट व्यवस्थेतील धोका, नाशिक आयटी प्रकरणातून उघड
पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होत नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र विरोधकांकडून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून राजकारण केले जात असल्याचा आरोपही सत्ताधाऱ्यांनी केला. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सौरभ तायडे, योगेश म्हस्के, ग्रामसेवक रामदासी बारवकर, कृष्णा मेहेत्रे, अॅड. संदीप मेहेत्रे, दिलीप आढाव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








