व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Uddhav Balasaheb Thackeray : संघटना बळकट करण्यासाठी ठाकरेंचा पक्ष रस्त्यावर उतरणार!

Uddhav Balasaheb Thackeray : संघटना बळकट करण्यासाठी ठाकरेंचा पक्ष रस्त्यावर उतरणार!

Bal Thackeray’s birth centenary to be marked with a resolve by Shivsena to strengthen its organisation : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निर्धार; चिखलीतील बैठकीत चर्चा

Chikhli आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २३ जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२७या कालावधीत उद्धवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे नियोजन संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने चिखलीत उपनेते आ. नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. नितीन देशमुख यांनी संघटना मजबूत करायची असेल तर केवळ बैठका घेऊन चालणार नाही, तर जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आंदोलनातूनच कार्यकर्त्यांची ओळख निर्माण होते आणि त्यातूनच पक्षाची ताकद वाढते.

Vidarbha Farmers : व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी खरेदी प्रक्रियेत अडथळे?, चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा

प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाची ओळख निर्माण केली पाहिजे, त्यानुषंगाने पदाधिकाऱ्यांनी महत्वाकांक्षी राहून जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात, तसेच नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन संघटनेचा विस्तार करावा, असे आवाहन केले. तर जयश्री शेळकेंनी संघटना वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकाने संकल्प करावा आणि गावपातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी झटावे, असे आवाहन केले. दरम्यान, प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सध्याच्या राजकारणात दिसणारे वाद हे जनतेच्या प्रश्नांसाठी नसून स्वार्थ आणि सत्तेसाठी आहेत, असा आरोप केला.

Nashik it case : कॉर्पोरेट व्यवस्थेतील धोका, नाशिक आयटी प्रकरणातून उघड

आमदार सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरा मूळ पक्ष असल्याचे सांगत न्यायालयाचा अंतिम निकालही आपल्याच बाजूला लागणार, असा विश्वास व्यक्त केला. मेहकर, देऊळगाव राजा आणि खामगाव या मतदारसंघांमध्ये पक्षबांधणीची जबाबदारी स्वतः स्वीकारत असल्याची घोषणा केली.

Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण !

जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गजानन वाघ, दत्ता पाटील, वसंतराव भोजने, डी. एस. लहाने, चंदा बडे, विजया खडसान, सुमित सरदार, विलास सुरडकर, आशिष राहटे, नंदू कन्हाडे, शुभम पाटील, श्रीकिसन धोंडगे, श्रीराम झोरे, प्रीतम गैची, नगराध्यक्ष किशोर गारोळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!