व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी

Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी

Suraj goje is co-opt member from shivsena in Nagpur municipal corporation: दिलेला शब्द पाळला, भाजपकडून सात नावांची अधिकृत घोषणा

Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षाला दिलेला शब्द भारतीय जनता पक्षाने अखेर पाळला आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी भाजपने आपल्या सहा अनुभवी कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या एका शिलेदाराची वर्णी लावत ‘युती धर्म’ निभावला आहे. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आज सात नावांची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे निवडणूक न लढवताही शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज गोजे थेट महापालिकेत पोहोचले असून, राजकीय वर्तुळात ही ‘वचनपूर्ती’ चर्चेचा विषय ठरली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली, तरी जागावाटपावरून शिवसेनेत मोठा असंतोष निर्माण झाला होता. भाजपने शिवसेनेला केवळ सहा जागा दिल्या होत्या आणि त्यातील चार जागांवर आपलेच उमेदवार लादले होते, असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. शिवसेनेच्या कोट्यातून केवळ एकच नगरसेवक निवडून आला आणि तो सुद्धा मुळचा भाजपचाच उमेदवार होता. दोन जागांसाठी युती कशाला केली? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला होता. मात्र, त्यावेळी भाजपने शिवसेनेला एक स्वीकृत सदस्य देण्याचे आश्वासन दिले होते. आज शिवसेना शहर प्रमुख सूरज गोजे यांच्या नावाची घोषणा करून भाजपने त्या नाराजीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!

भाजपने जाहीर केलेल्या यादीत शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे संतुलन साधण्यात आले आहे. यात प्रामुख्याने देवेंद्र मेहर (पूर्व नागपूर), विनोद बघेल (पश्चिम नागपूर), संजय ठाकरे (दक्षिण नागपूर), जितू ठाकूर (उत्तर नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर) आणि सुबोध आचार्य (मध्य नागपूर) या सहा नावांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर काहींनी पक्षादेश मानून बंडापासून माघार घेतली होती. त्यांच्या याच निष्ठेचे फळ म्हणून भाजपने त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ‘ॲक्शन मोड’वर! ड्रग्ज रॅकेटचा ‘मोठा गेम’ होणार

आम्ही युतीचा धर्म पाळला असून मित्रपक्षाला दिलेले वचन पूर्ण केले आहे, असे स्पष्ट मत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही नावे जाहीर करताना व्यक्त केले. भाजपने आपल्या कोट्यातील जागा शिवसेनेला देऊन एकीकडे महापालिकेत आपली पकड मजबूत केली आहे, तर दुसरीकडे मित्रपक्षाला सोबत घेऊन आगामी राजकीय संघर्षासाठी मोर्चेबांधणी केली आहे. २० एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत या सर्व नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

error: Content is protected !!