व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : भाजप म्हणजे महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती...

Vijay Wadettiwar : भाजप म्हणजे महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती प्रहार!

BJP is the ‘serial killer’ of women’s reservation; criticism by Vijay Wadettiwar : भाजपने श्रेय लाटून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप

Nagpur २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने त्याला पूर्ण समर्थन दिले होते. मात्र, ज्या विधेयकात नारी शक्तीचा साधेपणाने उल्लेखही नव्हता, त्याचं श्रेय लाटणाऱ्या भाजपने महिलांची फसवणूकच केली आहे. खरं सांगायचं तर भाजपच महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’ आहे,” अशा अत्यंत तिखट आणि आक्रमक शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर प्रहार केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपच्या ‘महिला आक्रोश’ आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, २०-३० महिलांना एकत्र जमवून केलेले आंदोलन म्हणजे जनतेचा आवाज नव्हे. वरळीमध्ये काल एका सामान्य भगिनीने ज्या शूरवीराप्रमाणे सरकारला आरसा दाखवला, तो खरा आक्रोश होता. त्या एका महिलेच्या धाडसाने भाजपचे जुमलेबाजीचे राजकारण उघडे पाडले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, पण महिलांच्या हितावर भाष्य करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. राहुल गांधी हे एक सच्चे माणूस असून त्यांनी महिला आरक्षणाबाबत नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे, मात्र निवडणुका आल्या की उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत सरड्यासारखे रंग कोण बदलतं, हे देशाला चांगलंच ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

trump-tariff : 166 अब्ज डॉलर्स परताव्याची प्रक्रिया सुरू, भारताला अप्रत्यक्ष फायद्याची शक्यता !

यावेळी वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरही खळबळजनक भाष्य केले. सुनेत्रा ताईंनी ही भूमिका मांडायला उशीर केला आहे. हा अजित दादांचा घातपात आहे का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात होता आणि आजही आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जर हे वक्तव्य आधी आले असते तर राज्यात आगडोंब उसळला असता, पण आता हे प्रकरण शांत झाले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!