व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rajasingh Thakur : अकबराच्या समाधीवरून वादग्रस्त मागणी; हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंवर अन्याय

Rajasingh Thakur : अकबराच्या समाधीवरून वादग्रस्त मागणी; हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंवर अन्याय

Raja Singh Thakur criticises the functioning of the Government of Maharashtra : भाजप आमदार राजासिंह ठाकूर यांचा महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर हल्ला

Akola महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, तेलंगणातील गोसीमहाल मतदारसंघाचे भाजप आमदार राजासिंह ठाकूर यांनी अकोल्यातील हिंदुराष्ट्र जागृती सभेत सरकार व प्रशासनावर जोरदार टीका केली. छत्रपती संभाजीनगर येथील अकबराच्या समाधीचा उल्लेख करत, अशा ऐतिहासिक स्थळांवर होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने गोरक्षण रोडवर रविवारी सायंकाळी आयोजित विराट हिंदुराष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्वाती खाड्ये व सुनील घनवट उपस्थित होते.

राजासिंह ठाकूर म्हणाले की, राज्यात गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद यांसारख्या घटना घडत असून, हिंदू संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळवताना अडथळे निर्माण होत आहेत. अकोल्यात येताना पोलिस प्रशासनाने नोटीस देऊन भाषणावर बंधने घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“अकोल्याचे वातावरण बिघडविण्याचा आमचा हेतू नसून, झोपलेल्या हिंदूंना जागे करून संघटित करणे हा आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करत त्यांनी धर्मविरोधी शक्तींना ठाम उत्तर देण्याची गरज व्यक्त केली.

Ncp leadership conflict : प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार शीतयुद्ध उघड !

सभेदरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारी निधी खर्च होण्यावर टीका करत, ती कबर हटविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाचे ‘टिपू सुलतान’ नाव बदलून ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे करण्याची मागणीही त्यांनी केली.

Dr. Sunil Deshmukh : मनपाचा कारभार म्हणजे, ‘शस्त्रक्रिया यशस्वी, रुग्ण दगावला’; माजी मंत्र्यांचा भ्रष्टाचारावर घणाघात

कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेते पवन महल्ले, माजी महापौर सुमनताई गावंडे, राजेश मिश्रा, योगेश अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने कार्यक्रमासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे संवर्धन करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!