व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mohan Bhagwat: आंदोलन युवकांचा हक्कच, मात्र संविधान अन् कायद्याची चौकट महत्त्वाची

Mohan Bhagwat: आंदोलन युवकांचा हक्कच, मात्र संविधान अन् कायद्याची चौकट महत्त्वाची

Protests are a right of the youth, but the Constitution and the framework of law are equally important, RSS chief Mohan Bhagwat says : सरसंघाचलाक मोहन भागवत यांचे युवकांना आवाहन

Nagpur आपला देश प्रचंड मोठा असून भाषा, प्रांत आणि विचारात विविधता असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर सर्वांचे एकमत होऊ शकत नाही आणि विरोध होणे हा त्याचाच एक भाग आहे. आंदोलन करण्याचा युवकांना अधिकार आहे. मात्र, विरोध करताना आवाज मोठा झाला तरी आपले सर्वांचे मूळ एकच आहे, देशाचा कायदा, संविधान आणि संस्कृतीच्या चौकटीत राहूनच आपल्याला पुढे जायचे आहे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते बोलत होते. दिल्लीतील ‘नीट’ पेपरफुटी विरोधातील तरुणांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सरसंघचालकांनी आपल्या भाषणात विशेषतः युवा पिढीच्या भूमिकेवर भर दिला.

Pm Modi : लहान स्वप्नांना आता मुठमाती; २०४७ पर्यंत विकसित भारताचा निर्धार !

युवा पिढीच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय भारत विश्वगुरू बनू शकत नाही, हे स्पष्ट करत त्यांनी तरुण वर्गाला राष्ट्र उभारणीत पुढे येण्याचे आवाहन केले. आजची युवा पिढी ३० वर्षांनंतर जुनी पिढी होईल, त्यामुळे आजच्या तरुणांना केवळ स्वतःच्याच नव्हे, तर येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करून पावले उचलावी लागतील. भारताची स्वतःची स्वतंत्र ओळख आणि समृद्ध संस्कृती आहे. इतर देश केवळ भौतिक प्रगतीचा विचार करतात, परंतु सर्वांना सोबत घेऊन संतुलनाची वाट दाखवणे हे भारताचे कर्तव्य आहे.

Fda Action : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टच्या १४ केंद्रांवर एफडीएची कठोर कारवाई

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक पिढ्यांनी आणि राष्ट्रपुरुषांनी स्वतःच्या हिताचा त्याग केला असून, त्यापैकी बहुतांश लोक तरुणच होते. युवकांमध्ये अफाट धाडस, ऊर्जा आणि स्वतःला झोकून देण्याची इच्छा असते. तरुणांनी वैयक्तिक व कौतुकिक चिंतेच्या पलीकडे जाऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे धाडस कायम ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे चारही दिशांना पाहणारे धम्मचक्र आहे. ते आपल्याला कायदा, संविधान, शील, बल आणि संस्कृतीचे रक्षण करत प्रगती करण्याचा संदेश देते. सर्व प्रकारची विविधता असली तरी ‘हम सब साथ चलेंगे’ या भावनेने देश आणि आपल्या राष्ट्रध्वजाची शान कायम ठेवण्याचे आवाहन सरसंघचालकांनी शेवटी केले.

error: Content is protected !!