व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Khamgao Politics : डिवरेंचे ‘चॅलेंज’ चर्चेत; खामगावात शिंदेसेनेचा दावा, महायुतीत खळबळ

Khamgao Politics : डिवरेंचे ‘चॅलेंज’ चर्चेत; खामगावात शिंदेसेनेचा दावा, महायुतीत खळबळ

conflicts in mahayuti due to viral video of shivsena leader santosh diwre : व्हायरल भाषणाने राजकारण तापले; डिवरेंच्या विधानामुळे महायुतीत तणावाचे संकेत

Khamgao अलीकडील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष डिवरे यांच्या वक्तव्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एका आढावा बैठकीत केलेले त्यांचे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यातून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डिवरे यांनी आगामी निवडणुकीत खामगाव मतदारसंघातून शिंदेसेनेचा आमदार निवडून आणण्याचे ‘चॅलेंज’ दिले. तसेच पक्षाच्या नेत्यांवर टीका झाल्यास ठामपणे प्रत्युत्तर देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की कायम राहणार?

खामगाव मतदारसंघ परंपरेने भाजपच्या वाट्याला राहिला असून, मागील तीन कार्यकाळांत भाजपचे आमदार येथे निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेने स्वतंत्र दावा केल्यास महायुतीतील सहयोगी पक्षांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

NCP Ajit Pawar : एक ‘कॉल’ आणि सारा खेळ बदलला; बुलढाण्यातील बंडाळीला अचानक ब्रेक

दरम्यान, स्थानिक पातळीवर शिंदेसेना आणि भाजप यांच्यात काही मुद्द्यांवर आधीपासूनच मतभेद असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत डिवरे यांच्या वक्तव्यामुळे हे मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात महायुतीत जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकांवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!