व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की...

Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की कायम राहणार?

Water issue of Malkapur dominates the District Planning Committee meeting : मलकापूरचा पाणी प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला

Buldhana मलकापूर शहरातील पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असताना, या प्रश्नाभोवती राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी पाणीप्रश्नाला प्राधान्य देत तो थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवला; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची सत्ता व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासमोर पाणीटंचाईचा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय मांडण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र या बैठकीसाठी नगराध्यक्षांनाच निमंत्रण नसल्याने चर्चेला उधाण आले.

NCP Ajit Pawar : एक ‘कॉल’ आणि सारा खेळ बदलला; बुलढाण्यातील बंडाळीला अचानक ब्रेक

अखेर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नगराध्यक्षांना बैठकीत सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या व त्यांना ‘एन्ट्री’ मिळाली. या घडामोडींमुळे प्रशासकीय प्रक्रियेपेक्षा राजकीय हस्तक्षेप अधिक प्रभावी ठरत असल्याची टीका होत आहे.बैठकीत ‘एन्ट्री’ मिळाली, पण आता प्रत्यक्षात पाणीप्रश्न मार्गी लागतो का, की अडकून राहतो, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!