व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule : ममता बॅनर्जींचे ‘थर्ड डिग्री’ राजकारण जनतेने उध्वस्त केले

Chandrashekhar Bawankule : ममता बॅनर्जींचे ‘थर्ड डिग्री’ राजकारण जनतेने उध्वस्त केले

people destroyed mamta banerjee’s third degree politics : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Nagpur पश्चिम बंगालमधील जनतेने विकासाला मतदान करून ममता बॅनर्जी यांच्या ‘थर्ड डिग्री’ राजकारणाला पूर्णपणे उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी बंगालमधील विजयाचे विश्लेषण करतानाच महाराष्ट्रातील विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.

बावनकुळे म्हणाले की, बंगालच्या जनतेने विकसित पश्चिम बंगालसाठी आपला कौल दिला आहे. संपूर्ण देश आणि जनता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या पाठीशी उभी आहे. मात्र, महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेते आणि विशेषतः काँग्रेस अजूनही सुधरायला तयार नाही. महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, ते पाहता विरोधी पक्षाचे नेते २०४७ पर्यंत घरीच बसतील, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील विरोधकांनी बंगालच्या निकालातून धडा घ्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Cabinet reshuffle : मंत्रिमंडळात निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू तर नव्या चेहऱ्यांना संधी !

बंगालमधील यशामागे भाजप आणि संघ परिवाराच्या हजारो कार्यकर्त्यांचा मोठा संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कार्यकर्त्यांच्या तिथे हत्या करण्यात आल्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुथ मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित केले. बंगालमधील ‘दुष्ट शासन’ संपवून त्याठिकाणी सुशासन आले पाहिजे, ही संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांची भावना होती आणि आज ती सत्यात उतरली आहे, असे बावनकुळे म्हणाले.

conflicts in mahayuti : खामगावात महायुतीत तडे; शिंदेसेना-राष्ट्रवादी जवळीक वाढली!

यावेळी त्यांनी नरसापूर येथील पीडित प्रकरणावरही भाष्य केले. संपूर्ण महाराष्ट्र पीडित कुटुंबाच्या बाजूने उभा असल्याचे सांगत त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात पीडितांना शब्द दिला असून, दोषींना यमसदनी पाठवण्यासाठी पोलीस आणि सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, अशी ग्वाही देखील बावनकुळे यांनी दिली.

error: Content is protected !!