Long list of aspirants from Akola keen to enter the Legislative Council : अकोल्यातून विधान परिषदेसाठी मोठी फिल्डींग, इच्छुकांची मोठी यादी
Akola अकोल्यातून विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. यावेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ‘अकोल्याला पुन्हा संधी मिळणार का?’ हा प्रश्न अधिकच गाजू लागला आहे.
यापूर्वी माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजय मिळवला होता, तर त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया परभणी-हिंगोली मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र सध्याच्या घडीला राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.
Ravi Rana : ‘ज्यांचे केस पांढरे झाले आहेत, त्यांनी दिवसा स्वप्न पाहणे सोडावे’
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांनी पडद्यामागे हालचाली सुरू केल्या असून, उमेदवारीसाठी चढाओढ वाढत आहे. दरम्यान, ही जागा महायुतीत नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाने अकोला जिल्ह्याची जबाबदारी सुरुवातीला राजन साळवी आणि नंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपविल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
District planning committee : नियोजन समितीत भाजपच ‘बॉस’, बॅलन्स साधण्यासाठी मित्र पक्षांना संधी
सरनाईक यांचे अकोल्याशी असलेले संबंध लक्षात घेता विविध तर्क-वितर्कांना आणखी बळ मिळत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने या मतदारसंघातील राजकीय चित्र अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होईपर्यंत चर्चांचे आणि पडद्यामागील हालचालींचे राजकारण कायम राहणार, असे चित्र सध्या दिसत आहे.








