congress unable to select district president even after Sanghatan Srujan Abhiyan : काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कायम; निर्णयप्रक्रियेवर प्रश्न
Buldhana जिल्ह्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती अद्याप प्रलंबित असल्याने पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुलाखती पूर्ण होऊन इच्छुकांची यादी दिल्लीकडे पाठवण्यात आली असली, तरी अंतिम निर्णय जाहीर न झाल्याने स्थानिक पातळीवरील संघटनात्मक हालचाली ठप्प झाल्याची चर्चा आहे. ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा दावा पक्षाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात निर्णयप्रक्रिया ‘हाय कमांड’कडे अडकून पडल्याचे चित्र आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्ली दौरा करूनही अंतिम मान्यता मिळालेली नाही. वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्या अनुपस्थितीमुळेही प्रक्रियेला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, इच्छुकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत असून, नव्या नेतृत्वाला संधी मिळणार की पारंपरिक गटांनाच पुन्हा प्राधान्य दिले जाणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
Har Ghar Nal Scheme : २१ गावांचा टँकरवर जीव; ‘हर घर नल’ योजनेचे स्वप्न कागदावरच?
या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारे नेतृत्व निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य निर्णय झाल्यास संघटनाला नवे बळ मिळू शकते; अन्यथा हा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होऊन स्थानिक राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
Bacchu Kadu : सरकारविरोधात भूमिका मांडणारेच सरकारमध्ये बसतील तर आम्ही काय करायचे?
उद्धव सेनेतून कॉग्रेसमध्ये आलेल्या संदीप शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी ते सध्या सर्वात आघाडीवर आहेत. संघटन सृजन अभियान राबवत असताना इच्छुक नेत्यांनी शक्ती प्रदर्शन केले होते. आता कुणाला जिल्हाध्यक्षपद मिळते याकडे लक्ष लागले आहे. शेळके यांना जुन्या नेत्यांचे आव्हान आहे. जिल्हाध्यक्षपदावर कुणाची निवड होते त्यावरच कॉंग्रेसचे संघटन ठरणार आहे.








