व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nashik tcs case : सूत्रधार निदा खान अखेर अटकेत, विदेशी फंडिंग, आंतरराष्ट्रीय...

Nashik tcs case : सूत्रधार निदा खान अखेर अटकेत, विदेशी फंडिंग, आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास वेगात

nashik-tcs-conversion-case-nida-khan-arrested-foreign-funding-international-links-investigation : नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात मोठी कारवाई

Nashik : राज्यभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी संशयित आरोपी निदा खान हिला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले असून तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला निर्णायक वळण मिळाल्याचे मानले जात आहे.

नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली. निदा खान गेल्या काही आठवड्यांपासून पोलिसांना चकवा देत होती. तिच्या शोधासाठी राज्यभरात विशेष पथके तैनात करण्यात आली होती. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सापळा रचत तिला ताब्यात घेतले. अटकेनंतर तिला कडेकोट बंदोबस्तात नाशिकमध्ये आणण्यात आले असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिच्यावर अधिकृत अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली.

पोलिसांनी निदा खानकडून दोन स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत. या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात डिजिटल माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि परदेशातील संपर्क यासंदर्भातील माहिती या उपकरणांमधून उघड होण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणांनी सायबर विश्लेषण सुरू केले आहे.

Mamata banerjee : पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांच्या ममता राजवटीचा अस्त

या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि संघटित कट रचल्याचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान निदा खान ही आरोपींना मदत करण्यासोबतच धर्मांतराच्या संपूर्ण रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

विशेष तपास पथकाच्या प्राथमिक चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेर आणि परदेशातील काही व्यक्तींशी जोडले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. विदेशी फंडिंगद्वारे काही उपक्रमांना आर्थिक मदत पुरवली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची चौकशी आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांचे विश्लेषण यावर विशेष भर देण्यात आला आहे.

Collector of Nagpur: नायब तहसीलदारांना जेसीबीने फरफटत नेणाऱ्या मुजोर मालकाची रवानगी जेलमध्ये

दरम्यान, निदा खान २५ मार्चपासून फरार होती. तिच्या अटकेनंतर आता संपूर्ण प्रकरणातील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि कथित धर्मांतर साखळीबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून आगामी काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!