व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : बावनकुळे यांच्या ताफ्यात चक्क पाच महागड्या गाड्यांचा लवाजमा, भाजपची...

Chandrashekhar bawankule : बावनकुळे यांच्या ताफ्यात चक्क पाच महागड्या गाड्यांचा लवाजमा, भाजपची हीच का काटकसर?

A convoy of as many as five luxury vehicles in Minister Chandrashekhar Bawankule’s fleet; opposition targets him : विरोधकांचा सवाल, नागपूरच्या पालकमंत्र्यांची ‘काटकसर’ चर्चेत; मोदींच्या भाषणानंतर नवा वाद

Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या काटकसरीच्या आणि स्वदेशीच्या आवाहनावरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच, राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंधन टंचाई आणि आर्थिक शिस्तीसाठी जनतेला काटकसरीचा सल्ला देणाऱ्या बावनकुळे यांच्या ताफ्यात चक्क पाच महागड्या गाड्यांचा लवाजमा दिसून आल्याने, भाजपची हीच का काटकसर? असा खोचक सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे.

आज कामठी विधानसभा मतदारसंघातील भव्य हनुमान मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यात तब्बल पाच आलिशान गाड्यांचा समावेश असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, याच दौऱ्यादरम्यान त्यांनी जागतिक परिस्थितीचा दाखला देत नागरिकांनी इंधन आणि सोन्याच्या बाबतीत काटकसर करावी, तसेच सौर ऊर्जा व ईव्ही गाड्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन केले होते. मात्र, एका बाजूला जनतेला बचतीचे धडे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वतः मात्र गाड्यांचा ताफा घेऊन फिरायचे, हा पालकमंत्र्यांचा विरोधाभास आता चर्चेचा विषय ठरला आहे.

Devendra fadnavis : फडणवीसांच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना विमान प्रवासाला बंदी !

या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आधीच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काटकसरीची सुरुवात लोकप्रतिनिधींनी स्वतःपासून करावी, अशी सूचना केली होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपच्या उधळपट्टीकडे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध घातले असले, तरी रस्ते प्रवासात मंत्र्यांचा व्हीआयपी थाट कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका वृत्तवाहिनीने बावनकुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांचे चित्रण केले असून, यावरून आता आगामी काळात पालकमंत्र्यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!