व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण राष्ट्रवादी’च्या उंबरठ्यावरच ‘भोंदूगिरी’चा पहारा? गणेशपेठेतील पक्ष कर्यालयातील ‘यंत्रा’ने खळबळ!

राष्ट्रवादी’च्या उंबरठ्यावरच ‘भोंदूगिरी’चा पहारा? गणेशपेठेतील पक्ष कर्यालयातील ‘यंत्रा’ने खळबळ!

Shri Yantra at NCP’s Ganeshpeth party office sparks a stir : केवळ ‘श्रद्धा’ आहे की खरात सारख्या भोंदूगिरीचे छुपे समर्थन?

Nagpur एकडे ‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडल्या असतानाच, आता खुद्द पक्षाच्या कार्यालयातील एका कृत्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ‘श्री यंत्रा’चे छायाचित्र लावण्यात आले आहे. ज्या ‘यंत्रा’चा आधार घेऊन खरातने अनेकांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचे तपासात उघड झाले, त्याच यंत्राचे प्रदर्शन पक्षाच्या अधिकृत कार्यालयावर कशासाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अशोक खरातने मंत्रतंत्र, अंगठ्या, गंडे-दोरे आणि ‘सिद्ध’ केलेल्या यंत्रांच्या नावाखाली सामान्य जनतेला लुबाडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तपासात चाकणकर यांच्या माध्यमातून खरातचा संपर्क राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. हा सर्व घटनाक्रम ताजा असतानाच आणि तपास सुरू असतानाच, गणेशपेठ कार्यालयावर दिसणारे हे श्री यंत्र म्हणजे केवळ ‘श्रद्धा’ आहे की खरात सारख्या भोंदूगिरीचे छुपे समर्थन? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.

New reservation rule : सवलत घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नोकरभरती बंद !

अजित दादा, स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी लढा दिला. शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालण्याचा दावा करणाऱ्या पक्षात अशा प्रकारे आध्यात्मिक प्रतीकांचा सार्वजनिक वापर होणे हे अत्यंत विसंगत मानले जात आहे. भोंदूगिरीच्या आरोपांमुळे पक्ष आधीच अडचणीत असताना अशी प्रतीके लावून संशयाला वाव दिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक सुशिक्षित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कार्यालयावरील हे यंत्र खटकत आहे. एकिकडे आमचे नेते चौकशीला सामोरे जात आहेत आणि दुसरीकडे आपण त्याच वादग्रस्त प्रतीकांचे प्रदर्शन करून पक्षाची प्रतिमा मलीन करत आहोत, अशी दबक्या आवाजातील चर्चा पक्षवर्तुळात सुरू आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने कोणीही उघडपणे भाष्य करण्यास तयार नाही.

cm Maharashtra : मुख्यमंत्र्यांची बुलेटस्वारी वादाच्या भोवऱ्यात; पीयूसी एक्स्पायर असल्याने विरोधकांचा ‘पब्लिसिटी स्टंट’चा आरोप

राजकीय कार्यालये ही लोकशाहीची आणि जनसेवेची केंद्रे असतात. तिथे विज्ञानाची आणि संविधानाची पाठराखण होणे अपेक्षित असताना अशा प्रकारे यंत्र-तंत्राची छायाचित्रे लावणे, हे कार्यकर्त्यांना आणि समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आधीच पक्षाची नाचक्की झाली असताना, या ‘यंत्र’ वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा बॅकफूटवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!