व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur congress: नागपुरात काँग्रेसचा अखेर भाकरी फिरवली, प्रफुल गुडधे नवे शहराध्यक्ष, ठाकरे...

Nagpur congress: नागपुरात काँग्रेसचा अखेर भाकरी फिरवली, प्रफुल गुडधे नवे शहराध्यक्ष, ठाकरे गटाला धक्का

Prafull gudadhe is Nagpur congress new president, big blow to vikas Thakre: संघटन सृजन अभियानाने संपवले ‘ठाकरे पर्व’

Nagpur काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कलाटणी देणारी एक मोठी घडामोड समोर आली असून नागपूर शहरात तब्बल एक तपानंतर म्हणजेच १२ वर्षांनी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि अभ्यासू नेते प्रफुल गुडधे यांची नवे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हा बदल आमदार विकास ठाकरे यांच्या गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात राबवल्या गेलेल्या ‘संघटन सृजन अभियाना’चा हा एक भाग असून, यामुळे नागपूर काँग्रेसमधील प्रदीर्घ ‘ठाकरे पर्वा’ला तूर्तास ब्रेक लागला आहे.

गेल्या दशकभरापासून नागपूर काँग्रेसवर विकास ठाकरे यांचा एकछत्री अंमल होता. या काळात माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले असे अनेक प्रदेशाध्यक्ष बदलले, मात्र नागपूरचे शहराध्यक्षपद ठाकरे यांच्याकडेच राहिले. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलतात, पण नागपूरचे शहराध्यक्ष नाही, अशी मिश्किल टिप्पणीही राजकीय वर्तुळात केली जात होती. यंदाच्या संघटन निवडणुकीत स्वतः विकास ठाकरे यांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता आणि त्यांच्या समर्थकांची संख्या पाहता त्यांचाच गट बाजी मारेल असा अंदाज होता. मात्र, हायकमांडने थेट खांदेपालट करत पक्षापेक्षा कोणीही मोठा नसल्याचा कडक संदेश दिला आहे.

Ashok chavhan on Sharad Pawar: भाजप नेते म्हणतात, शरद पवारांचा ‘सौदा’ कधीच घाट्याचा असू शकत नाही

या मोठ्या फेरबदलांमागे अलीकडची अंतर्गत नाराजी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात वाद टळले असले, तरी निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून पक्षात मोठा भडका उडाला होता. विकास ठाकरे यांनी आपले सुपुत्र केतन ठाकरे आणि अतुल कोटेचा यांना स्वीकृत सदस्य केल्यामुळे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती आणि अनेकांनी राजीनामेही दिले होते. या अंतर्गत वादाची मोठी किंमत अखेर विकास ठाकरे यांना मोजावी लागल्याचे बोलले जात आहे.

Neet paper scam : नीट पेपरफुटीचे नागपूर कनेक्शन; १ हजार विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय

नवे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे हे अभ्यासू, अनुभवी आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दोनदा विधानसभा लढवण्याचे धाडस दाखवणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, आता शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांच्यासमोर आव्हानांचे मोठे डोंगर असतील. त्यांना आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून थेट रस्त्यावर उतरावे लागेल आणि आंदोलन करावे लागेल. तसेच, विकास ठाकरे यांच्या काळात नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षाशी जोडण्याचे आणि नागपूर काँग्रेसमध्ये नवचैतन्य फुंकण्याचे मुख्य आव्हान गुडधे यांच्यासमोर असेल. आता गुडधे नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपवून पक्षाला कशी उभारी देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!