Workers of Uddhav Thackeray Distribute ‘Melody Chocolates’ at Petrol Pumps : इंधन टंचाईवर अनोखा निषेध; डिझेल-पेट्रोल प्रश्नावर राजकारण तापले
पेट्रोल-Malkapur डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २१ मे रोजी शहरातील एका पेट्रोल पंपावर ‘मेलोडी चॉकलेट’ वाटप करत केंद्र सरकारविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला. इंधनटंचाईमुळे शेतकरी व वाहनधारक त्रस्त असल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व गॅसची गंभीर टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करत, कडक उन्हात वाहनधारक आणि शेतकरी इंधनासाठी रांगा लावत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेख करत आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात ‘मेलोडी चॉकलेट’ वाटप करून सरकारवर टीका केली.
शहरातील सहा पेट्रोल पंपांपैकी पाच पंप बंद असल्याने नांदुरा रोडवरील एका पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. वाढत्या रांगा आणि इंधन उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Akola Shivsena : अकोला जिल्ह्यात शिंदे शिवसेनेची धुरा कोणाच्या खांद्यावर?
या आंदोलनात शहरप्रमुख हरिदास गणबास, विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, नगरसेवक रफिक बर्तनवाले, माजी उपनगराध्यक्ष महादेव वनारे, नितीन गोसावी, इयान लकी, हसन गौरी, अनंता तायडे, संतोष राजपूत, शरय खराटे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.








