व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde Shivsena : अंतर्गत गटबाजीने नुकसान झाले, आता एकनाथ शिंदे लक्ष...

Eknath Shinde Shivsena : अंतर्गत गटबाजीने नुकसान झाले, आता एकनाथ शिंदे लक्ष घालणार!

Eknath Shinde to focus on strengthening Shivsena’s organizational structure in Akola : अकोल्यात शिवसेनेची नव्याने मोर्चेबांधणी; संघटन मजबूत करण्यावर भर

Akola एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अंतर्गत गटबाजीमुळे संघटनात्मक कमकुवतपणा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करत संघटनेत मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निष्ठावान आणि आक्रमक नेतृत्वाच्या हाती जबाबदाऱ्या सोपवत शिवसेनेने अकोल्यात पुन्हा संघटन उभारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात शहरासह ग्रामीण भागात झालेल्या विविध पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र असून, विरोधी पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनीही भगवा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

Amravati legislative election : अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी ४५३ मतदार सज्ज, आज निघणार अधिसूचना

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ अनासाने, महानगराध्यक्ष राजेश मिश्रा, डॉ. अशोक कोळंबे, ज्येष्ठ नगरसेविका उषाताई विरक यांच्यासह अनेक जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी पुन्हा संघटन मजबुतीसाठी मैदानात उतरत पक्षात नवचैतन्य निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, शिवसेना अकोला जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी युवा नेतृत्व ललित भाऊ वानखडे यांच्या खांद्यावर सोपविल्यानंतर संघटनेला आक्रमक दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या ललित भाऊ वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभर बैठका, मेळावे, दौरे आणि जनसंपर्क अभियानांचा धडाका लावला आहे. गावोगावी शिवसैनिकांना एकत्र करत संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी त्यांनी व्यापक रणनीती आखल्याची चर्चा आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : जिल्हाप्रमुख बदलताच उद्धव ठाकरेंना धक्का; सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये!

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची सुरू असलेली ही आक्रमक मोर्चेबांधणी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाभरात सुरू असलेल्या बैठका आणि शक्तिप्रदर्शनामुळे अनेक ठिकाणी विरोधी गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ललित वानखडे यांच्यासह चंद्रशेखर पांडे गुरुजी, नारायणरावजी गव्हाणकर, संतोष भाऊ अनासाने, राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, मनोज पाटील, सागर भारुका आदी पदाधिकारी शहरासह संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. “अकोल्यात पुन्हा भगवा फडकणार” असा दावा शिवसैनिकांकडून उघडपणे केला जात असून, आगामी काळात अकोला जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना पुन्हा एकदा निर्णायक शक्ती म्हणून उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!