व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amravati legislative election : अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी ४५३ मतदार सज्ज, आज...

Amravati legislative election : अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी ४५३ मतदार सज्ज, आज निघणार अधिसूचना

453 voters set for the Amravati Legislative Council election; notification to be issued today : सात मतदान केंद्रांवर होणार मतदान; २२६ महिला तर २२७ पुरुष मतदार ठरविणार आमदार

Amravati महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २२६ महिला आणि २२७ पुरुष असे एकूण ४५३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची राजकीय वातावरणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला असताना जिल्हा प्रशासनानेही निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. धारणी, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, तिवसा-भातकुली, अमरावती आणि चांदूर रेल्वे या सात उपविभागीय स्तरांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका सदस्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात सर्वाधिक ९५ मतदार अमरावती उपविभागात आहेत, तर तिवसा-भातकुली उपविभागात सर्वांत कमी ३८ मतदार आहेत. याशिवाय मोर्शी येथे ८१, अचलपूर येथे ६९, चांदूर रेल्वे येथे ६६, दर्यापूर येथे ६१ आणि धारणी येथे ४३ मतदार आहेत.

Uddhav Balasaheb Thackeray : जिल्हाप्रमुख बदलताच उद्धव ठाकरेंना धक्का; सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये!

या निवडणुकीसाठीची प्रशासकीय तयारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख व अन्य अधिकारी कामकाज पाहत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यसंख्या
अचलपूर नगरपरिषदेत ४६ सदस्य, अंजनगाव सुजी ३२, वरूड ३०, दर्यापूर २९, मोर्शी २८, चिखलदरा २३, शेंदुरजना घाट २३, चांदूर रेल्वे २३, चांदूर बाजार २३, धामणगाव रेल्वे २३, धारणी २०, नांदगाव खंडेश्वर २०, तिवसा १९, भातकुली १९ आणि अमरावती महानगरपालिकेत ९५ सदस्य आहेत. या सर्वांसह मतदारसंख्या ४५३ इतकी आहे.

Petrol diesel price hike : 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर 7.35 तर डिझेल 7.53 रुपयांनी महागले !

सात ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. धारणी येथे चिखलदरा नगरपरिषद सदस्य मतदान करणार असून, अचलपूर येथे चांदूर बाजार, मोर्शी येथे वरूड व शेंदुरजना घाट, दर्यापूर येथे अंजनगाव सुजी, तिवसा येथे भातकुली, अमरावती येथे महानगरपालिका सदस्य, तर चांदूर रेल्वे येथे धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथील सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

error: Content is protected !!