व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Fuel price hike : बैलगाडी, गाढव, घोडे अन् सायकल; इंधन दरवाढीचा अनोखा...

Fuel price hike : बैलगाडी, गाढव, घोडे अन् सायकल; इंधन दरवाढीचा अनोखा निषेध

Vanchit Bahujan Aghadi’s bullock cart protest against the fuel price hike : वंचित बहूजन आघाडीचा बैलगाडी मोर्चा, निवेदन स्वीकारण्यासाठी उपजिल्हाधिकारी मोर्चात आले

Akola पेट्रोल, डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढत आहे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या असून, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सतत वाढणाऱ्या किमती, वाढती अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाईविरोधात जगणे कठीण झाले आहे, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात मोदी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र राज्य सरकार विरुद्ध मोर्चा काढण्यात आला.

या बैलगाडी मोर्चा मध्ये सायकल, गाढव, घोडे,घोडागाडी, बैलगाडी आणि मोठ्या संख्येत सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आले याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला.

Devendra fadnavis : मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक करत फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अकोल्यातील 45 डिग्री उन्हात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात अकोला येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात बैलगाड्या, गाढवे, सायकल आणि घोडे यांचा वापर करून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण

पाच पदाधिकारी जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी नेते ह्यांनी घेतली.जिल्हा प्रशासन मोर्चात येऊन निवेदन घ्यावे असा आग्रह धरल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मोर्चात येऊन निवेदन स्वीकारले.अधिकारी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारणे हे पहिल्यांदा घडले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. बैलगाडी आणि प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

error: Content is protected !!