Question mark over professor recruitment in BGE Society; demand for dissolution of the executive committee : आजीवन सभासद रूपचंद अग्रवाल यांचा गैरव्यवहाराचा आरोप; व्यवस्थापनाकडून आरोपांचे खंडन
Akola बेरार जनरल एज्युकेशन (बीजीई) सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार, माहिती दडपशाही आणि प्राध्यापक भरती प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संस्थेचे आजीवन सभासद रूपचंद अग्रवाल यांनी केले आहेत. त्यांनी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून भरती प्रक्रिया शासनाच्या नियंत्रणाखाली राबविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण विभागाकडे केली आहे.
रूपचंद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या निवडणुकीनंतर मार्च २०२६ पासून संस्थेच्या कामकाजासंबंधी १२ ते १५ पत्रांद्वारे विविध माहिती मागितली होती. मात्र, तीन महिन्यांनंतरही एकाही पत्राला उत्तर देण्यात आले नाही.
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक आजीवन सभासदाला संस्थेच्या कामकाजाची माहिती मिळण्याचा अधिकार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. तरीही कार्यकारिणीकडून माहिती लपविली जात असल्याने संशय अधिक बळावला आहे, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. प्राध्यापक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेव झाल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, न्यायालयाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Fuel price hike : ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या’, ‘जनतेचा पैसा परत द्या’
मुख्य आरोप
राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल (आरएलटी) विज्ञान महाविद्यालय आणि नथमल गोयनका विधी महाविद्यालयातील ३३ सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधील कोट्यवधी रुपयांचा मुद्दा.
संस्थेच्या बैठकींची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग.
बिंदूनामावलीतील आरक्षणाचा प्रश्न.
अस्थायी कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील १० कोटी २ लाख ६९ हजार १११ रुपयांची माहिती.
या सर्व माहितीची मागणी करूनही ती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव, उच्च शिक्षण संचालक आणि अमरावती विभागीय सहसंचालक यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली आहे.
“विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून प्राध्यापक भरती प्रक्रिया शासनाच्या अखत्यारीत राबवावी, अन्यथा विद्यार्थी आणि उमेदवारांचे मोठे नुकसान होईल,” अशी मागणी रूपचंद अग्रवाल यांनी केली आहे.
Toxic liquor case : पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर
बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “२०१७ पासून बीजीई सोसायटीमध्ये कोणतीही नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे मोहता यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “संस्था कठीण परिस्थितीतून विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी निराधार आरोप करत आहेत. भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असतील तर संबंधितांनी पोलिसांत तक्रार करावी.”








